प्रेस फोटोग्राफर्सलाही राजाश्रय मिळावा

By Admin | Updated: August 21, 2015 03:26 IST2015-08-21T03:26:12+5:302015-08-21T03:26:12+5:30

मूर्तिकार व चित्रकारांना ज्याप्रमाणे राजाश्रय मिळाला, त्याचप्रमाणे प्रेस फोटोग्राफर्सनाही राजाश्रय मिळावा,

Press photographers also get a royal patronage | प्रेस फोटोग्राफर्सलाही राजाश्रय मिळावा

प्रेस फोटोग्राफर्सलाही राजाश्रय मिळावा

ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सत्कार
नागपूर : मूर्तिकार व चित्रकारांना ज्याप्रमाणे राजाश्रय मिळाला, त्याचप्रमाणे प्रेस फोटोग्राफर्सनाही राजाश्रय मिळावा, अशी भावना ज्येष्ठ वृत्तछायाचित्रकार जयंत हरकरे यांनी व्यक्त केली. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त नागपूर प्रेस फोटोग्राफर्स असोसिएशन व आॅरेंज सिटी वॉटरच्यावतीने दोन ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात जयंत हरक रे व ज्येष्ठ छायाचित्रकार गजाभाऊ भिसेकर यांचा सत्कार जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील, भाजप नेते देवेंद्र दस्तुरे, नगरसेविका चेतना टांक, मनसेचे प्रशांत पवार, ओसीडब्ल्यूचे कम्युनिकेशन हेड सचिन द्रवेकर, संस्थेचे अध्यक्ष राजेश टिकले, सचिव अनंत मुळे आदी उपस्थित होते. जागतिक छायाचित्रदिनानिमित्त चिटणवीस सेंटरमध्ये छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शन बघायला छायाचित्रणामध्ये विशेष आवड असणाऱ्यांनी गर्दी केली होती. ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर आधारीत चित्र लक्षवेधी ठरले. या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी पुढच्या वर्षापासून समारोहाला १ लाख रुपयांची मदत जाहीर केली. (प्रतिनिधी)

Web Title: Press photographers also get a royal patronage