राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला मंजुरी
By Admin | Updated: September 8, 2015 05:29 IST2015-09-08T05:29:19+5:302015-09-08T05:29:19+5:30
महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्णजयंती महोत्सवात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी होकार दिला आहे.

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला मंजुरी
नागपूर : महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्णजयंती महोत्सवात सहभागी होण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी होकार दिला आहे. राष्ट्रपतींकडून होकार मिळताच मनपा प्रशासन निमंत्रण पत्रिकेच्या तयारीला लागले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी आज मंगळवारी पदाधिकारी व विभागप्रमुखांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मनपाच्या मुख्य समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव गं्रथाचे प्रकाशन, मनपाच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व भांडेवाडी येथील २०० एमएलडी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राचे भूमिपूजन केले जाणार आहे.
प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती कार्यालयाकडून निमंत्रण पत्रिकेत काही बदल सुचविण्यात आले होते. त्यानुसार निमंत्रण पत्रिकांची छपाई केली जाणार आहे. निमंत्रण पत्रिकांची छपाई होताच याची एक प्रत घेऊ न मनपाचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे. यावेळी राष्ट्रपतींना खास निमंत्रण देण्यात येईल.
कार्यक्रमनिमित्ताने सुरक्षा व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती, राजभवन येथील व्यवस्था यासंदर्भात मनपातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची मंगळवारी संयुक्त बैठक होणार आहे. यात संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली जाणार आहे. (प्रतिनिधी)