राष्ट्रपती नागपूर दौऱ्यावर

By Admin | Updated: September 11, 2015 03:22 IST2015-09-11T03:22:08+5:302015-09-11T03:22:08+5:30

भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे नागपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.

President visits Nagpur | राष्ट्रपती नागपूर दौऱ्यावर

राष्ट्रपती नागपूर दौऱ्यावर

नागपूर : भारताचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी हे नागपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.५५ वाजता दिल्लीहून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन होईल.
सायंकाळी ६.३० वाजता विभागीय क्रीडा कॉम्प्लेक्स मानकापूर येथे त्यांचे आगमन होईल. ६.३५ ते ७.२५ वाजेपर्यंत नागपूर महानगरपालिकेच्या १५१ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
रात्री ७.३० वाजता राजभवनला आगमन व मुक्काम. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता व्हीएनआयटीच्या १३ व्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला व्हीएनआयटी येथे उपस्थित राहतील. दुपारी १२.४० वाजता नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण करतील.

Web Title: President visits Nagpur