शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

दीक्षाभूमी संपूर्ण विश्वाला त्याग, शांती व मानवतेची प्रेरणा देते -  रामनाथ कोविंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 14:38 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नागपुरात आगमन झाले आहे. नागपुरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रपतींनी दीक्षाभूमीला भेट दिली व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शनही घेतले.  

नागपूर, दि. 22- राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज नागपूच्या दौ-यावर आहेत.  नागपुरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रपतींनी दीक्षाभूमीला भेट दिली व बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शनही घेतले. ‘परमपूज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि समाजक्रांतीचा पाया या भूमीवर रचला. ज्यामुळे भारतीय तसेच संपूर्ण मानव समाज प्रगतीच्या मार्गात अग्रेसर होऊ शकला, ही पवित्र दीक्षाभूमी संपूर्ण विश्वाला त्याग, शांती व मानवता याकडे जाण्यास प्रेरणा देते.  मला येथे येऊन अपार प्रसन्नता होत आहे', असे यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिप्राय पुस्तिकेवर लिहिले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपती झाल्यावर ते पहिल्यांदाच दीक्षाभूमीला आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जून सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले आदी उपस्थित होते. 

सकाळी 10.25 वाजता त्यांचा ताफा दीक्षाभूमीवर पोहोचला. स्तुपाच्या आत जाऊन तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर राष्ट्रपती त्याच ठिकाणी पाच मिनिटे ध्यानस्थ बसले. यावेळी डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने त्यांना स्मृतीचिन्ह व ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा बौद्ध धम्मग्रंथ दिला. यावेळी त्यांनी दीक्षाभूमीच्या परिसराचे अवलोकन केले.

 

असा आहे दौरासकाळी १० वाजता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळसकाळी १०.२५ ते १०.४५ वाजता : दीक्षाभूमीला भेटसकाळी ११.५५ ते १२.१० वाजता : श्री शांतिनाथ जैन मंदिराला भेटदुपारी १२.५५ ते १.४० वाजता : कामठी येथील विपश्यना मेडिटेशन सेंटरचे उद्घाटनदुपारी १.४० वाजता : राजभवनाकडे प्रयाणदुपारी २.१० वाजता : राजभवन येथे आगमनदुपारी ४ वाजेपर्यंत : राखीव वेळसायंकाळी ४.१५ वाजता : नागपूर महापालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या सुरेश भट नाट्य सभागृहाचे उद्घाटनसायंकाळी ५ वाजता : विमानतळाकडे प्रयाणसायंकाळी ५.२५ वाजता : नागपूर विमानतळ येथून भारतीय हवाई दलाच्या विमानाने दिल्लीसाठी प्रयाण

टॅग्स :BJPभाजपाRamnath Kovindरामनाथ कोविंद