अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र सरनाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST2021-06-23T04:07:36+5:302021-06-23T04:07:36+5:30
नागपूर : नागपूरच्या अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या नवीन कार्यकारिणीची २०२१-२२ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी लीला मोरेस ...

अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र सरनाईक
नागपूर : नागपूरच्या अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या नवीन कार्यकारिणीची २०२१-२२ या वर्षासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी लीला मोरेस चेस्ट क्लिनिकचे संचालक पल्मोनोलॉजिस्ट डॉ. रवींद्र सरनाईक यांची तर प्रख्यात पल्मोनोलॉजिस्ट डॉ. नयनेश पटेल यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
अकॅडमी ही एक प्रतिष्ठित वैद्यकीय संस्था असून २५०० पेक्षा जास्त स्पेशालिट आणि सुपर स्पेशालिट डॉक्टर सदस्य आहेत. २०२१-२२ या वर्षासाठी निवडलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष (इलेक्ट) डॉ. राजेश अटल, उपाध्यक्ष डॉ. अजय अंबाडे, डॉ. संजय जैन, कोषाध्यक्ष डॉ. समीर जहागीरदार, सहसचिव डॉ. मिलिंद भृशुंडी, डॉ. अनुराधा रिधोरकर आणि कार्यकारी सदस्यांमध्ये डॉ. सुनील लांजेवार, डॉ. मीना मिश्रा, डॉ. समीर पालतेवार, डॉ. परिमल तायडे, डॉ दिनेश सिंह, डॉ. शहनाज चिमथानवाला, डॉ. मनोज पहुकर, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. प्रवीण शिंगाडे, डॉ. राजश्री खोत, डॉ. नीरज बाहेती, डॉ. संजय कृपलानी, डॉ. अजय लांजेवार आणि डॉ प्राजक्ता देशमुख यांचा समावेश आहे.