स्मार्ट सिटी संमेलनात सहा प्रकल्पांचे सादरीकरण

By Admin | Updated: April 6, 2017 02:25 IST2017-04-06T02:25:15+5:302017-04-06T02:25:15+5:30

नागपूर महापालिकेच्यावतीने ‘स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी’ प्रकल्पाचा उद्देश लोकांपर्यंत

Presentation of six projects in the Smart City Summit | स्मार्ट सिटी संमेलनात सहा प्रकल्पांचे सादरीकरण

स्मार्ट सिटी संमेलनात सहा प्रकल्पांचे सादरीकरण

मनपा प्रशासन सज्ज : १०० महापौरांसह ५०० मान्यवर निमंत्रित
नागपूर : नागपूर महापालिकेच्यावतीने ‘स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी’ प्रकल्पाचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून त्याचा प्रसार करण्यासाठी नोएडा येथील इलेटस् टेक्नोमीडिया प्रा.लि. यांच्या सहकार्याने ७ आणि ८ एप्रिल रोजी आयोजित स्मार्ट सिटी शिखर संमेलनात महापालिकेच्या सहा प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
२४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, हिट अ‍ॅक्शन प्लॅन, आॅरेंज सिटी स्ट्रीट, ग्रीन बस वाहतूक व नागपूर स्मार्ट आणि सुरक्षित सिटी प्रकल्पांचा यात समावेश आहे. या शिखर संमेलनात स्मार्ट सिटीसाठी निवड करण्यात आलेल्या देशभरातील १०० महापालिकांचे महापौर, आयुक्त, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. काही महापौरांकडून संमेलनात सहभागी होण्याला होकार मिळाला आहे. महापालिकेच्या नागपूर स्मार्ट आणि सुरक्षित सिटी प्रकल्पांतर्गत सिटी नेटवर्क, वायफाय सिटी, सुरक्षेसाठी शहरात चार हजार सीसीटीव्ही बसविणे, स्मार्ट वाहतूक, स्मार्ट पथदिवे, स्मार्ट वाहतूक नियंत्रण, स्मार्ट पार्किंग व स्मार्ट पर्यावरण आदींचा समावेश आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विविध शहरात सुरू असलेल्या उपक्रमांच्या माहितीची देवाण-घेवाण या परिषदेच्या माध्यमातून होणार आहे. ‘स्मार्ट आयडिया’ मांडण्याच्या आणि त्या अमलात आणण्यासाठी गुंतवणुकीच्या दृष्टीने नागपूर कसे चांगले शहर आहे, याची शिखर संमेलनात मांडणी करण्यात येईल, अशी माहिती अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी दिली.
विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी खासगी आणि सहकार क्षेत्रातील देशभरातील विचारवंत, धोरण तयार करणारे, उद्योग तज्ज्ञ आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाशी संबंधित अन्य भागधारक आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील स्मार्ट नागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने अनुभव आणि कल्पनांची देवाण-घेवाण करण्यासाठी या संमेलनाच्या निमित्ताने चांगले व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचा विश्वास सोनवणे यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)

Web Title: Presentation of six projects in the Smart City Summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.