आषाढी एकादशीच्या पर्वावर भावगीतांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST2021-07-22T04:07:28+5:302021-07-22T04:07:28+5:30
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आषाढी एकादशीच्या पर्वावर कीर्तन, अभंगवाणी व पाऊले चालती पंढरीची वाट हे भावगीतांचे ...

आषाढी एकादशीच्या पर्वावर भावगीतांचे सादरीकरण
नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आषाढी एकादशीच्या पर्वावर कीर्तन, अभंगवाणी व पाऊले चालती पंढरीची वाट हे भावगीतांचे कार्यक्रम सादर झाले.
ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात संज्याेत केतकर यांनी कीर्तन सादर केले. त्यांना तबल्यावर सोहम जोशी, संवादिनीवर चिंतामणी निमकर व झांज वर स्वानंद बेहेरे यांनी संगत केली. बालकलावंतांच्या अभंगवाणीमध्ये भक्तीगीत व नृत्याचे सादरीकरण झाले. सोहम कलाविष्कारच्यावतीने सादर झालेल्या या कार्यक्रमात मैत्रेय मोहरील, अक्षय चारभाई, निधी रानडे, अथर्व लुलेकर, आयुषी देशमुख, स्वरदा कोनान्ने, सान्वी मास्टे, नंदिनी गडकरी या बालकलावंतांनी सहभाग घेतला. संयोजन गजानन रानडे व स्नेहल रानडे यांचे होते. आनंद मास्टे, रघुवीर पुराणिक, ऐश्वर्या महानाईक, सोहम रानडे, निनाद गडकरी या वाद्यवृंदांनी संगत केली. निवेदन वैदेही खोपकर यांचे होते.
संस्कार भारतीच्यावतीने सादर झालेल्या अभंगवाणीमध्ये केतकी कुळकर्णी, नितीन वाघ, अनघा रानडे, कवि नेसन, अमित लांडगे यांनी भावगीते सादर केली. त्यांना सुरमणी वसंत जळीत, नरेंद्र माहुलकर, श्याम सरोदे, मंगेश परसोडकर, निलय परसोडकर यांनी वाद्यांवर संगत केली.
..................