शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून लक्षात घेऊन तयारी करा : पालकमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 21:20 IST

जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. परंतु आता मान्सून सक्रिय होत आहे. तेव्हा पावसाळा लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेतील उत्तम समन्वयाच्या माध्यमातून कोरोनाबाधित रुग्णवाढीवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. परंतु आता मान्सून सक्रिय होत आहे. तेव्हा पावसाळा लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने कोरोनासंदर्भातील उपाययोजनांना गती द्यावी, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय आढावा बैठक बोलावण्यात आली होती. त्यात त्यांनी उपरोक्त सूचना केल्या. बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक राकेश ओला आदी उपस्थित होते.खासगी रुग्णालयांवर ठेवा लक्षखासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्याबाबत असलेल्या मार्गदर्शक तत्त्वाचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, याबाबतची अद्ययावत माहिती सर्व संबंधित यंत्रणांनी ठेवावी. शासकीय वैद्यकीय रुग्णालये व महानगरपालिकेची रुग्णालये असली तरीही भविष्यात खासगी रुग्णालये शासकीय दरांमध्ये रुग्णांच्या सेवेत कायम सुरु ठेवण्याची सक्ती करावी.कन्टेन्मेंट झोनमधील रुग्णांना तात्काळ भरती करावेयावेळी पालकमंत्र्यांनी कन्टेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवांना वगळले असले तरीही कोरोनाबाधित रुग्णांसह इतर आजाराच्या रुग्णांनाही तात्काळ रुग्णालयांत दाखल करण्यासाठी सूट द्यावी, असे निर्देश दिले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतnagpurनागपूर