शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

लोकसभा-विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 9:23 PM

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यादृष्टीने विदर्भातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा संदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील सर्व लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधून पक्षसंघटनेचा आढावा घेतला.

ठळक मुद्देउद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद : विदर्भात संघटनात्मक बांधणीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असून त्यादृष्टीने विदर्भातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असा संदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील सर्व लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसमवेत संवाद साधून पक्षसंघटनेचा आढावा घेतला. जवळपास साडेतीन वर्षांनंतर विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला हे विशेष.http://cms.lokmat.com/topics/ contest Lok Sabha and Assembly elections on self उद्धव ठाकरे यांचे शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर ते थेट रविभवनला रवाना झाले व सकाळी ११ वाजेपासून बैठकांच्या सत्राला प्रारंभ झाला. दिवसभरात त्यांनी नागपूर, रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, अमरावती, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर, अकोला व बुलडाणा या लोकसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक लोकसभेतील संघटनेचा विस्तार, संघटनेतील त्रुटी, पक्षाच्या जमेच्या बाजू, जनतेच्या शिवसेनेकडून असलेल्या अपेक्षा इत्यादी बाबी जाणून घेतल्या. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पुढील निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय झाला असल्याने प्रत्येकाने आतापासूनच कामाला लागले पाहिजे. त्यासाठी पक्षाला मजबुती देण्यासाठी प्रयत्न करा, असे उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा.अरविंद सावंत, खा.आनंद अडसूळ, खा.भावना गवळी, खा.कृपाल तुमाने, खा.प्रताप जाधव, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीला विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख, सहसंपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हा संघटक, जिल्हा परिषद अध्यक्ष हे पदाधिकारी उपस्थित होते.नागपुरात आणखी एक जिल्हाप्रमुख हवानागपुरातील कार्याचा भविष्यातील विस्तार लक्षात घेता आणखी एक जिल्हाप्रमुख हवा, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी बैठकीदरम्यान केली. मनपा निवडणुकांमध्ये शिवसेनेचा दारुण पराभव झाल्यानंतर सतीश हरडे यांच्या जागी माजी खासदार प्रकाश जाधव यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र पक्षसंघटना बळकटीसाठी आणखी एक जिल्हाप्रमुख हवा, अशी भूमिका त्यांनी मांडली.काही कार्यकर्त्यांची नाराजीदरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीला आपल्याला निमंत्रित केले नाही, म्हणून काही कार्यकर्ते नाराज झाले होते. रविभवन परिसरात विदर्भातील प्रत्येक लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मात्र बैठकीला निवडक पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला. यावरुन काही कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने धक्काअतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय हे धडाडीचे व कर्तबगार पोलीस अधिकारी होते. त्यांची प्रकृती ठीक नव्हती व त्यांची झुंज सुरू होती. परंतु त्यांनी उचललेले पाऊल धक्कादायक आहे. असे व्हायला नको होते. या घटनेमुळे धक्काच बसला आहे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे