शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

नागद्वार यात्रेसाठी लालपरीची तयारी

By नरेश डोंगरे | Updated: July 19, 2024 18:45 IST

१ ऑगस्टपासून १० ऑगस्टपर्यंत सेवा : ४८ गाड्यांमधून भाविकांना घडविली जाणार यात्रा

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या नागद्वार यात्रेसाठी लालपरीने तयारी केली आहे. भाविकांना सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाकडून आतापासूनच नियोजन करण्यात आले असून त्यासंबंधाने वेगवेगळ्या आगार प्रमूख, विभाग नियंत्रकांना तयारीचे निर्देश देण्यात आले आहे.

विविध प्रांतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली नागद्वार यात्रा ऑगस्ट महिन्यात येते. मध्य प्रदेशातील पचमढी येथे ही यात्रा भरते आणि त्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगड तसेच मध्य प्रदेशासह विविध प्रांतातील लाखो भाविक यात्रेत सहभागी होतात. नागपूर-विदर्भातीलही हजारो भाविक त्यांच्या सोयीनुसार नागद्वार यात्रेला वेगवेगळ्या वाहनाने जातात. एसटी बसने जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. ते ध्यानात घेऊन भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने आतापासूनच तयारी चालविली आहे. त्यासाठी कोणत्या आगारातून किती बसेस सोडायच्या, त्यांचे वेळापत्रक कसे राहिल, त्याचा आढावा घेऊन नागपूर ते नागद्वार आणि नागद्वार ते नागपूर अशा २४ जाणाऱ्या आणि २४ येणाऱ्या (एकूण ४८) गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, नागद्वार मध्य प्रदेशात येते. अर्थात महाराष्ट्रातून तिकडे प्रवासी बस पाठवायच्या असेल तर त्यासाठी जाण्या-येण्याचा दोन्ही कडचा परवाना काढावा लागतो. त्यासाठी विशिष्ट करदेखिल भरावा लागतो. त्यामुळे तात्पुरते परवाने काढून घेण्याची ही प्रक्रिया आधीच पूर्ण करून घेण्याचे निर्देश संबंधित आगार प्रमूखांना वरिष्ठांकडून देण्यात आले आहे.

७५० रुपयांत जाण्या-येण्याचा प्रवास

नागपूरहून नागद्वार यात्रेसाठी जाणाऱ्या प्रवाशाला केवळ ३७५ रुपये तिकिट भाडे आकारले जाणार आहे. अर्थात यात्रेला जाण्या-येण्याचा प्रवास केवळ ७५० रुपयांत होणार आहे. गर्दीमुळे वेळेवर निराशा होऊ नये म्हणून प्रवासी आधीच आरक्षण (रिझर्वेशन) करू शकतात. त्यासाठी संबंधित प्रवाशांना पाच रुपये रिझर्वेशन फी द्यावी लागणार आहे. 

चार आगार, ४८ बसेस१ ऑगस्ट पासून नागद्वार यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी लालपरीची सेवा सुरू होणार असून, ती १० ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यासाठी गणेशपेठ आगारातून १६ बसेस, घाटरोड आगारातून १६ बसेस, ईमामवाडा आगारातून १० तर वर्धमान नगर आगारातून ६ अशा एकूण ४८ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. दर अर्ध्या तासानंतर भाविकांसाठी बस उपलब्ध राहणार आहे.

नागपूर आणि पचमढीत व्यवस्था

यात्रा व्यवस्था आणि बस वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. नागपूरच्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकावरून बसेस सुटेल. त्याचप्रमाणे नागपूर-विदर्भात परतीचा प्रवास करणाऱ्या भाविकांना पचमढी बसस्थानकावर व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती एसटीच्या नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी लोकमतला दिली आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरFairजत्रा