शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पॅन कार्ड उलगडणार प्रीतीची मोहमाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 22:07 IST

अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधीची माया जमविणारी कुख्यात ठगबाज प्रीती ज्योतिर्मय दास ऊर्फ हसीना आप्पा हिच्यासाठी तिच्या जवळ असलेले दोन पॅन कार्ड अडचण बनू शकतात.

ठळक मुद्देपोलिसांनी प्राप्तिकर खात्याला पाठविली माहिती : मोठ्या व्यवहाराचा खुलासा होण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांना ब्लॅकमेल करून कोट्यवधीची माया जमविणारी कुख्यात ठगबाज प्रीती ज्योतिर्मय दास ऊर्फ हसीना आप्पा हिच्यासाठी तिच्या जवळ असलेले दोन पॅन कार्ड अडचण बनू शकतात. पोलिसांनी तिच्या दोन पॅन कार्डबाबतची माहिती प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना कळविली आहे. त्यामुळे आर्थिक मालमत्तेसोबतच प्रीतीच्या मोहमाया यात अडकून कुणी आपले काळे धन आणि आतबट्ट्याचे आर्थिक व्यवहार मार्गी लावत होते काय, त्याचाही खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहेत.प्रीती दास हिच्याकडे दोन पॅनकार्ड असल्याचा खळबळजनक खुलासा लोकमत'ने गुरुवारी १८ जून रोजी केला होता. त्यामुळे तपास यंत्रणांच्या नजरा तिकडे वळल्या. पाचपावली पोलिसांनी गुरुवारी प्राप्तिकर खात्याला तिच्याकडे दोन पॅन कार्ड असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे कळविली, असे पाचपावली पोलीस सांगतात. त्यामुळे आता पोलिसांसोबतच प्रीतीला प्राप्तिकर खात्याच्या चौकशीचाही सामना करावा लागू शकतो. असे झाल्यास प्रीतीने अनेकांना फसवून, धमकावून, ब्लॅकमेल करून कोट्यवधींची माया गोळा केली ती तिने कुठे ठेवली त्याचाही उलगडा होऊ शकतो. याशिवाय दोन पॅनकार्डचा वापर ती कोणत्या हेतूने करायची,याचेही कोडे सुटू शकते. तिचे काही कथित नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध असल्याचे आजवरच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे या नेत्यांची काळी कमाई प्रीती गौरी बनून मार्गी लावायची की पाटलीण बनून आर्थिक कारभार करायची, याचासुद्धा उलगडा होणार आहे.अनेक बँकांमध्ये प्रीतीची खातीप्रीतीची अनेक बँकांमध्ये खाती असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रीयीकृत बँकेसोबतच दोन खासगी बँकांमध्येही तिचे खाते असल्याची माहिती पुढे आल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी नागपुरातील जवळपास सर्वच बँकांना पत्र देऊन प्रीती दास हिचे आपल्याकडे खाते आहे का, अशी विचारणा केली आहे.बँकेत लॉकरही असल्याची सूत्रांची माहिती आहे पोलीस मात्र आपल्याकडे अशी माहिती उघड झाली नसल्याचे सांगतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर