'लुटेरी दुल्हन' गजाआड, पोलीस अधिकारी अन् राजकीय पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 05:03 PM2020-06-14T17:03:45+5:302020-06-14T17:05:16+5:30

गुन्हा दाखल झाल्यानंतर तिनं जामिनासाठी प्रयत्न केले, पण तिच्या प्रयत्नांना यश न आल्यानं पाचपावली पोलिसांनी तिला अटक केली.

Preeti Das arrested by police on Saturday | 'लुटेरी दुल्हन' गजाआड, पोलीस अधिकारी अन् राजकीय पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

'लुटेरी दुल्हन' गजाआड, पोलीस अधिकारी अन् राजकीय पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

Next

नागपूरः लुटेरी दुल्हन नावानं ओळखल्या जाणाऱ्या प्रीती दासला पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी प्रीतीचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्या संबंधांचा फायदा घेऊन ती अनेकांना चुना लावायची. महाठग प्रीती दास हिने तिच्या एका वर्ध्याच्या मित्रालाही ठगविल्याचे उघड झाले आहे. नवल राधेश्याम पांडे (वय २९) नामक तरुणाने प्रीतीविरुद्ध तक्रार नोंदविली होती. त्यावरून सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठगबाज प्रीतीविरुद्ध दाखल झालेला हा चौथा गुन्हा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिनं जामिनासाठी प्रयत्न केले, पण तिच्या प्रयत्नांना यश न आल्यानं पाचपावली पोलिसांनी तिला अटक केली. प्रीती दास हिच्याविरोधात नागपुरात चार पोलीस ठाण्यात खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हा नोंदवलेले आहेत. विशेष म्हणजे एवढे गुन्हे दाखल असतानाही पोलिसांच्या अनेक  कार्यक्रमालाही ती उपस्थिती लावत होती. प्रीती दास हिचे काही पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चांगले संबंध होते. याचाच फायदा घेत ती काही महिलांनाही धमक्या देत होती. प्रीती पोलीस अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांसोबत काढलेले फोटो दाखवून अनेकांना गंडवत होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिनं जिल्हा आणि उच्च न्यायालयाचेही दरवाजे  ठोठावले, याकामातही पोलिसांनी तिला मदतच केली. मिळालेल्या माहितीनुसार, एका पोलिसानं तिला पत्नीचा दर्जा दिला होता, तर दुसऱ्या एका पोलिसानं स्वतःचं एटीएम कार्ड आणि एक प्लॉट घेऊन दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रीती फरार होती. पण अटक होणार हे कळल्यानंतर ती पोलिसांना शरण आली. 

प्रीती दासला अटक झाल्यानंतर नागपूर शहरातील अनेक पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. प्रीती आपल्याबद्दल तर काही बोलणार नाही ना, याची भीती या पोलिसांना आता सतावते आहे. प्रीतीला अटक होताच काही राजकीय पदाधिकारी आणि पोलीसवाले पाचपावली पोलीस स्टेशनच्या बाहेर येरझाऱ्या मारत आहेत. प्रीतीनं गेल्या काही दिवसांपूर्वीच एका हॉटेलच्या मालकाला आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिनं एक मोठी पार्टीसुद्धा केली होती. त्यात तिच्या काही मैत्रिणीही सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी तिच्या तोंडाला केक लावण्यासाठी अनेकांनी  गर्दी केली होती. त्या केक लावणाऱ्यांचीही आता झोप उडालेली आहे.  

हेही वाचा

...तर परराष्ट्र धोरण रीसेट करावं लागेल, सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला 

"एक दिवस POKचे लोकच म्हणतील आम्हाला भारतात राहायचं"

बापरे! कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच महिलेवर अंत्यसंस्कार; 'एवढे' पॉझिटिव्ह तर तब्बल 350 कुटुंबांवर टांगती तलवार

कोरोनाची दोन नवीन लक्षणं; आरोग्य मंत्रालयानं अपडेट केली यादी... जाणून घ्या!

'या' कठीण काळात भगवद्गीतेमध्ये शोधा शक्ती अन् शांती : तुलसी गबार्ड

CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित

CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन

Web Title: Preeti Das arrested by police on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.