खबरदारी व लसीकरण हाच काेराेनावरील उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:38+5:302021-04-11T04:08:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : तालुक्यात काेराेनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. साेबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव ...

खबरदारी व लसीकरण हाच काेराेनावरील उपाय
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : तालुक्यात काेराेनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. साेबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी शासनाने दिशानिर्देशानुसार खबरदारी घेऊन नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
पारशिवनी येथील महात्मा गांधी विद्यालयातील काेविड तपासणी केंद्राला शनिवारी भेट देत त्यांनी पाहणी केली. यावेळी बावनकुळे यांनी रुग्ण व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. साेबतच त्यांनी तहसील कार्यालयात भेट देऊन नायब तहसीलदार आर. आर. सय्याम यांच्याकडून पारशिवनी तालुक्यातील काेराेनाविषयक माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा महामंत्री किशोर रेवतकर, तालुका अध्यक्ष अतुल हजारे, जि. प. सदस्य व्यंकटेश कारेमोरे, जयराम मेहरकुळे, कमलाकर मेंघर, अशोक कुथे, राजू कडू, रामभाऊ दिवटे, प्रतीक वैद्य, लीलाधर बर्वे, रिंकेश चवरे, अर्शद शेख, फजीत सहारे, धर्मेंद्र गणवीर, सौरभ पोटभरे, आकाश वाढणकर आदी उपस्थित होते.