शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीण दटकेच राहणार नागपूर शहराध्यक्ष?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 22:11 IST

डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असतानादेखील अद्यापही सर्व ‘बूथ’ समितींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे शहराध्यक्षांची निवडदेखील खोळंबली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दटके हेच शहराध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

ठळक मुद्देनिवडीची अद्याप प्रतीक्षाच : ‘बूथ’ समितीच्या निवडणुकांचे वेळापत्रक गडबडले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर संघटनात्मक मजबुतीसाठी भाजपाकडून ‘बूथ’ समितीच्या निवडणुका लावण्यात आल्या. १० डिसेंबरपर्यंत या निवडणूका संपून नवीन शहराध्यक्षांची निवड होईल असा अंदाज होता. परंतु डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला असतानादेखील अद्यापही सर्व ‘बूथ’ समितींच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे शहराध्यक्षांची निवडदेखील खोळंबली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण दटके हेच शहराध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता आहे.भाजपमध्ये दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. संघटन पर्वांमध्ये जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता मेळावे घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी निश्चित झाले. २१ नोव्हेंबर रोजी नागपुरात भाजपाची संघटनात्मक बैठक झाली होती. यात नागपुरातील ‘बूथ’पातळीवरील निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले होते. २२ नोव्हेंबरपासून ‘बूथ’ पातळीवरील निवडणुकांना प्रत्यक्षात सुरुवात झाली. ३० नोव्हेंबरपर्यंत मंडळाच्या निवडणुका पूर्ण होतील असे वेळापत्रक होते. तर १० डिसेंबरपर्यंत नवीन शहराध्यक्ष निवडण्यात येणार होते.शहरात २ हजार ६५ ‘बूथ’ आहेत. त्यापैकी १८०० ‘बूथ’पातळीवर निवडणूका झाल्या आहेत. परंतु मध्य नागपुरातील मुस्लिमबहुल, उत्तर नागपुरातील अनुसूचित जाती-जमातीबहुल तसेच दक्षिण व पूर्व नागपुरातील मुस्लिमबहुल ‘बूथ’वर अद्यापही नियुक्ती झालेली नाही. येथे थोडी फार अडचण येत आहे. त्यामुळे वेळापत्रक काहीसे गडबडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.आणखी १० दिवस प्रतीक्षाचयासंदर्भात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता वेळापत्रक गडबडले असल्याचे त्यांनी मान्य केले. काही भागात ‘बूथ’ पातळीवर काही अडचणी आहेत. परंतु येत्या आठवड्यात तेथे नियुक्ती होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना विचारणा केली असता त्यांनी हिवाळी अधिवेशनामुळे नियुक्ती थोड्या रखडल्या असल्याचे सांगितले. मात्र पुढील १० दिवसांत भाजपच्या शहराध्यक्षांची निश्चित निवड होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर