एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रतीक्षा, चैताली, सुमेधा चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:09 IST2021-09-13T04:09:10+5:302021-09-13T04:09:10+5:30

नागपूर : नाटुकलाच्यावतीने आयोजित ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेत राजुरा येथील प्रतीक्षा वासनिक, पुणे येथील चैताली जाधव व अकोला येथील ...

Pratiksha, Chaitali, Sumedha shined in the solo acting competition | एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रतीक्षा, चैताली, सुमेधा चमकले

एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रतीक्षा, चैताली, सुमेधा चमकले

नागपूर : नाटुकलाच्यावतीने आयोजित ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेत राजुरा येथील प्रतीक्षा वासनिक, पुणे येथील चैताली जाधव व अकोला येथील डॉ. सुमेधा हर्षे यांनी बाजी मारत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले आहे.

स्पर्धेच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते देवेंद्र दोडके, रवींद्रन खडसे व ज्येष्ठ रंगकर्मी महेश रायपूरकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण डॉ. नीलकांत कुलसंगे, अधिश्री देशपांडे व देवेेंद्र बेलनकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जुही धर्मे यांनी केले. यावेळी नितीन श्रीखंडे, नितेश शेंडे, राजेश नाकाडे, जयंत बन्लावार, मनोज वासनिक, मुकुश काशीकर, स्वप्निल मून, प्रफुल्ल उरकुडे यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक स्वप्निल बनसोड यांनी केले तर आभार नितीन ठाकरे यांनी मानले.

..............

Web Title: Pratiksha, Chaitali, Sumedha shined in the solo acting competition