शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापनगरात दोन गटात जोरदार हाणामारी; गाड्यांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 05:43 IST

मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.

नागपूर : शहरातील वाहतूक व्यावसायिक संजू ऊर्फ संजय बागडी यांनी एका कारची तोडफोड केली तर त्या वाहनांमधील आरोपींनी बागडी यांची कार पेटवून दिली. या दोन्ही घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. अशात घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांसोबत बागडींनी  वाद घातला. त्यामुळे प्रकरणाला कलाटणी मिळाली. स्नेहनगरमध्ये मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. तत्पूर्वी  सुभाषनगरमध्ये युवकांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या दोन घटनांमुळे प्रतापनगरातील वातावरण मंगळवारी रात्री कमालीचे गरम झाले होते.

संजय बागडी यांचे टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स आहे. गणेशपेठ बसस्थानकाजवळ त्यांचे कार्यालय असून, अंबाझरीत निवासस्थान असल्याचे पोलीस सांगतात. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास बागडींचा स्नेहनगरमध्ये काही जणांसोबत वाद झाला. त्यातून बागडी यांनी वाद घालणारांच्या कारची तोडफोड केली. परिणामी त्या कारमधील दोघांनी बागडी यांच्या वॅगनआर कारला पेटवून दिले. या घटनेमुळे परिसरात वातावरण गरम झाले.

एकाने नियंत्रण कक्षाला तर नियंत्रण कक्षाने प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, प्रतापनगर पोलिसांचे पथक तेथे पोहचले. यावेळी तेथे बघ्यांची मोठी गर्दी होती. काय झाले, अशी विचारणा करणाºया पोलिसांसोबत कारमालक बागडी यांनी माहिती देण्याऐवजी वाद घातल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वाद घालणाºया बागडी यांना नीट उभेही राहता येत नव्हते. पोलिसांनी बागडी यांना पोलीस ठाणे आणि नंतर मेडिकलमध्ये नेले. तेथे त्यांची रात्री १२. ३० वाजतापर्यंत वैद्यकीय तपासणी सुरू होती. सुभाषनगरात प्रचंड तणाव

रात्री १०. ३० च्या सुमारास दारूच्या नशेत दोन टोळके एकमेकांसोबत भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. मिळालेल्या माहितीवरून प्रतापनगर पोलिसांचे पथक तेथे पोहचले. दोन्ही गटातील हाणामारी करणाºयांना त्यांनी पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे पोलीस ठाण्यात दोन्हीकडील मंडळी मोठ्या संख्येत पोहचली. त्यांच्यातील काही जण आपसी समेटाची भाषा वापरत होते तर काही जण आरोप-प्रत्यारोप करीत होते. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्याच्या बाजूचे वातावरण गरम होते. हाणामारी करणारांपैकी काही जण अल्पवयीन होते. त्यामुळे काय कारवाई करावी, यावर विचार सुरू असल्याचे प्रतापनगर पोलीस सांगत होते. 

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस