महाज्योतीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी प्रशांत वावगे

By आनंद डेकाटे | Updated: August 18, 2023 14:54 IST2023-08-18T14:53:22+5:302023-08-18T14:54:06+5:30

याआधी ते सहाय्यक संचालक (लेखा) या पदावर वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर येथे कार्यरत होते.

Prashant Vavge as Chief Accounts and Finance Officer of Mahajyoti | महाज्योतीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी प्रशांत वावगे

महाज्योतीच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी प्रशांत वावगे

नागपूर : 'महाज्योती' या संस्थेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी (उपसंचालक संवर्ग) या पदावर प्रशांत वावगे यांची पदोन्नती झाली आहे. याआधी ते सहाय्यक संचालक (लेखा) या पदावर वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर येथे कार्यरत होते. सोबतच मुख्य लेखा व वित्त अधिकारी हातमाग महामंडळ नागपूर या पदाचा अतिरिक्त प्रभार ही त्यांच्याकडे होता.

प्रशांत वावगे हे मुळचे बुलडाणा जिल्ह्यातील खुमगाव येथील आहेत. प्रशासकीय अधिकारी असण्यासोबतच प्रशांत वावगे हे उत्कृष्ट प्रेरणादायी वक्ता लेखक व कवीही आहेत. महाराष्ट्रभर त्यांनी व त्यांच्या अधिकारी पत्नी रश्मी तेलेवार वावगे यांनी स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकास, उद्योजकता विकास अशा विषयांवर व्याख्याने व सेमिनार केले असून त्यांची अनेक ई पुस्तके ही प्रसिद्ध आहेत.

Web Title: Prashant Vavge as Chief Accounts and Finance Officer of Mahajyoti

टॅग्स :Governmentसरकार