गीतसंगीताने रंगली प्रसारभारतीची मैफिल

By Admin | Updated: July 18, 2014 01:07 IST2014-07-18T01:07:02+5:302014-07-18T01:07:02+5:30

बहुजन हिताय बहुजन सुखाय हे घोषवाक्य असणाऱ्या प्रसारभारती आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचा ६७ वा वर्धापनदिन समारंभ रसिकांच्या भरपूर प्रतिसादात साजरा करण्यात आला.

Prasar Bharati's concert song song | गीतसंगीताने रंगली प्रसारभारतीची मैफिल

गीतसंगीताने रंगली प्रसारभारतीची मैफिल

आकाशवाणीचा वर्धापनदिन : श्रीनिधी आणि अंकिताचे गायन
नागपूर : बहुजन हिताय बहुजन सुखाय हे घोषवाक्य असणाऱ्या प्रसारभारती आकाशवाणीच्या नागपूर केंद्राचा ६७ वा वर्धापनदिन समारंभ रसिकांच्या भरपूर प्रतिसादात साजरा करण्यात आला. सायंटिफिक सभागृह, लक्ष्मीनगर येथे आयोजित या कार्यक्रमात नाट्यगीत आणि सुगम संगीताचे सुरेल सादरीकरण करण्यात आले.
आकाशवाणी सुगम संगीत स्पर्धा विजती गायिका श्रीनिधी घटाटे व आकाशवाणी नाट्यगीत स्पर्धा विजेती निकेता कानेटकर यांच्या गायनाची सुरेल बैठक यावेळी आयोजित करण्यात आली. आकाशवाणीच्या प्रसारण यंत्रणेत विशेषत्वाने योगदान देणाऱ्या गायन, नाटक, कविसंमेलन आदी क्षेत्रातील प्रतिभावंत कलावंतांसह आकाशवाणी केंद्रात कार्यरत असणाऱ्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा विशेष पुरस्काराने यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अपर महानिदेशक एम.एस. थॉमस, अभियांत्रिकी निदेशक रमेश घरडे, सहायक निदेशक आणि कार्यक्रम प्रमुख चंद्रमणी बेसेकर, सप्तकचे डॉ. उदय गुप्ते यांच्या हस्ते करण्यात आले. रमेश घरडे यांनी आरंभिक प्रास्ताविक केले. आकाशवाणीच्या ज्येष्ठ निवेदक श्रद्धा भारद्वाज व जयंत पात्रीकर यांनी प्रारंभ सत्राचे संचालन केले.
यानंतर श्रीनिधी घटाटे या युवा प्रतिभावंत गायिकेने सुगम संगीताचे सादरीकरण करून रसिकांना जिंकले. सुरमणी पं. प्रभाकर धाकडे यांची शिष्या असलेली श्रीनिधी एक चांगली गायिका आहे. तिने कवी राजा बढे यांची रचना ‘रसिका सवेच येई.., प्रेमात पावसाळी..आभाळाचे गर्द निळे.., पहिल्या प्रेमाचा तेजोमय चिन्मया...’ ही हृदय चक्रधर, म.भा. चव्हाण, मंगेश पाडगावकर यांची गीते सादर केलीत. या गीतांना पं. प्रभाकर धाकडे यांनी संगीत दिले. सहसंगत मोरेश्वर दहासहस्र, विशाल दहासहस्र, महेंद्र ढोले, आशिष साव, पं. प्रभाकर धाकडे, नासीर खान यांनी केली. यानंतर निकिता कानिटकर हिने मर्मबंधातली ठेव ही, वद जाऊ कुणाला शरण, आले रे बकुळ फुला..., देवता कामुकता रहिता आदी नाट्यपदांनी मैफिल रंगविली. तिला शिरीश भालेराव, दीपक फडणवीस, संदीप गुरमुळे यांनी साथसंगत केली. निवेदन आकाशवाणीच्या राधिका पात्रीकर यांनी केले. यावेळी श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी विविध कलावंतांचा सत्कार आकाशवाणीतर्फे करण्यात आला. (प्रतिनिधी)
‘अ’ श्रेणी संगीत कलावंत
सितारवादक नासीर खाँ, तबलावादक संदेश पोपटकर, सितारवादक अवनिंद्र शेवलीकर, व्हायोलिनवादक शिरीश भालेराव, गिटारवादक आशिषकुमार सावू.
कमल भोंडे - गायन, कल्याणी देशमुख - गायन, चित्रा मोडक - गायन, पं. प्रभाकर धाकडे - व्हायोलिनवादक, शंकर भट्टाचार्य - सरोदवादक, अनिलकुमार खोब्रागडे - सुगम गायन, स्मिता खर्डेनवीस - सुगम गायन
आकाशवाणी संगीत स्पर्धेत प्रथम पुरस्कार निकेता कानिटकर - नाट्यगीत स्पर्धा, श्रीनिधी घटाटे - सुगम गायन स्पर्धा
‘अ’ श्रेणी नाट्य कलावंत
श्याम सरवटे, अजित दिवाडकर, डॉ. सुनील पारसे, अपर्णा रमेश लखमापुरे, प्रभा देऊस्कर
‘अ’ श्रेणी हिंदी कलावंत
नारायण ग्वालानी, मनमोहन भटनागर
नाट्यलेखन पुरस्कार
नारायण ग्वालानी
राष्ट्रीय कवी
डॉ. यशवंत मनोहर, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रा. वसंत आबाजी डहाके, विठ्ठल वाघ
मराठी कवितेचा हिंदी अनुवाद
अमर आनंद रामटेके
राष्ट्रीय कवितांचे हिंदी वाचकस्वर
सॅमसन मानवटकर, अशोक जांभुळकर
तांत्रिक पुरस्कार
मोहन सिंग, रमेश घरडे
वार्षिक पुरस्कार कला विमल डोंगरे, डॉ. हरीश पाराशर, संजय भक्ते, सुभाष इंजेवार, संगीता अरजपुरे, श्रद्धा भारद्वाज, राधिका पात्रीकर, रवीन्द्र भुसारी, डॉ. सुरेखा ठक्कर, अंजली दुरुगकर, कल्पना नंदनपवार, आर.के. गोविंदराजन, चंद्रमणी बेसेकर. प्रसारण पुरुष गुणवंत थोरात आणि कृषी क्रांती प्रसारक म्हणून राम घोडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Prasar Bharati's concert song song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.