टेकडी गणेशाचा दुष्काळग्रस्तांना प्रसाद
By Admin | Updated: November 30, 2015 02:49 IST2015-11-30T02:49:35+5:302015-11-30T02:49:35+5:30
राज्यातील काही भागात दुष्काळ पडला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध संस्था संघटना पुढाकार घेत आहेत.

टेकडी गणेशाचा दुष्काळग्रस्तांना प्रसाद
मुख्यमंत्र्यांना दिला ५१ लाखांचा धनादेश : मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे
नागपूर : राज्यातील काही भागात दुष्काळ पडला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध संस्था संघटना पुढाकार घेत आहेत. रविवारी श्री गणेश टेकडी मंदीर संस्थानतर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपये मुख्यमंत्री निधीत देण्यात आले. मंदिर व्यवस्थापनातर्फे ५१ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर रविवारी टेकडी गणेश मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेऊन पूजा केली. राज्यातील जनतेला सुखी व समृद्ध ठेव, अशी गणरायाकडे मागणी करून त्यांनी पूजा केली.
मंदिर संस्थानच्यावतीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, गणेश टेकडी संस्थांनचे विश्वस्त पुंडलिकराव जवंजाळ व इतर उपस्थित होते.(प्रतिनिधी)