शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'अनिल देशमुखांनी कोणाला तरी वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देऊ नये'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 16:16 IST

अनिल देशमुख हे एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी समोर आणावे आणि माफीचे साक्षीदार व्हावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत बोलताना खळबळजनक खुलासा केला आहे. देशमुख हे एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले  हे त्यांनी समोर आणावं आणि माफीचे साक्षीदार व्हावे, असे आंबेडकर म्हणाले आहेत.

विशेष सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करत उच्च न्यायालयाच्या विशेष सुटीकालीन खंडपीठाने १२ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा सोमवारी ताबा घेत पुन्हा चौकशी सुरू केली आहे. त्यावरुन आंबेडकर यांनी हा खुलासा केला आहे. ते आज नागपुरात बोलत होते. 

सध्या राज्याच्या राजकारणात गुन्हेगारीकरण आणि भ्रष्टाचार वाढत आहे. आज परिस्थिती अशी आहे की फक्त जे मोहरे आहे त्यांचे नाव पुढे येत आहे. मात्र, राजा आणि वजीराचे नाव पुढे येत नाही. देशमुखांचा बळी दिला जात आहे. कलेक्शन झालं पण तो पैसा देशमुख यांच्याकडे नाही. मग तो पैसा कुठे गेला हे देशमुखांनी सांगावं, असंही ते म्हणाले.

अशा स्थितीत न्यायालयाची भूमिका महत्वाची झाली आहे. न्यायालयाने राजकारणातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण बद्दलचे प्रकरण लवकर निकाली काढावे. तसेच, राज्याच्या राज्यपालाने ही या सर्व स्थिती बद्दल योग्य निर्णय घ्यावा असे आवाहनही आंबेडकर यांनी केलं आहे.

यासोबतच, देवेंद्र फडणवीस हे ५ वर्ष राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना नवाब मलिक यांच्या कुटुंबातील लोकांनी दाऊदच्या माणसांकडून संपत्ती घेतल्याची माहिती होती. तेव्हा त्यांनी का हे प्रकरण उचलले नाही किंवा कारवाई केली नाही. आज जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, तेव्हा ते लक्ष दुसऱ्या बाजूला वेधण्यासाठी हे सर्व बाहेर आणत आहे, असा आपोपही आंबेडकर यांनी यावेळी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAnil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस