प्रफुल्ल गणात्रा यांना अजय-अमर सन्मान प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:08 IST2021-07-29T04:08:33+5:302021-07-29T04:08:33+5:30

नागपूर : विदर्भ सेवा समितीतर्फे कोरोनामुळे मृत्यू झालेले अजय पांडे यांच्या स्मरणार्थ अजय-अमर सेवा सन्मान सोहळ्याचे बुधवारी आयोजन ...

Praful Ganatra awarded Ajay-Amar honor | प्रफुल्ल गणात्रा यांना अजय-अमर सन्मान प्रदान

प्रफुल्ल गणात्रा यांना अजय-अमर सन्मान प्रदान

नागपूर : विदर्भ सेवा समितीतर्फे कोरोनामुळे मृत्यू झालेले अजय पांडे यांच्या स्मरणार्थ अजय-अमर सेवा सन्मान सोहळ्याचे बुधवारी आयोजन करण्यात आले. शहरात चार शाखा असलेल्या नवरात्र दवाखान्याचे प्रमुख प्रफुल्ल गणात्रा यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी अजय पांडे यांची मुलगी अंशिका पांडे, मोठे बंधू अरविंद पांडे, संजय पांडे, नगरसेवक मनोज गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भ सेवा समितीचे अध्यक्ष आनंद निर्बाण यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर कार्याध्यक्ष डॉ. संतोष मोदी यांनी संचालन केले. अशोक आर. गोयल यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व सहसचिव प्रशांत मानेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला गिरधारी मंत्री, विजय शर्मा, आशीष नेब, आकाश आचार्य, रज्जू चौरसिया, विजय तलाह, विजय नागरेचा, श्रीकांत दुबे, मनीष हुडिया हेदेखील उपस्थित होते.

Web Title: Praful Ganatra awarded Ajay-Amar honor