शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रफुल्ल गाडगेंवर ५०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 03:39 IST

वात्सल्य ग्रुपचे सीएमडी; इंदूरमध्ये गुन्हा दाखल

नागपूर : इंदूरमधील गुंतवणूकदारांनी वात्सल्य ग्रुपचे सीएमडी प्रफुल्ल गाडगे यांच्यावर ५०० कोटी रुपयांची फसवूणक केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात गाडगे यांच्यासह त्यांचे सहकारी नवाब बेग व मनवेंद्र मजुमदार यांच्याविरुद्ध इंदूर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आरोपकर्त्यांमध्ये वैभव निमा, प्रवीणसिंग, अजय पाटीदार, सुनील पांडे, किशोर सांखला, अरुणकुमार सराफ, राजेंद्र पाटीदार, अवतारसिंग व मनजित कौर यांचा समावेश आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गाडगे यांनी वात्सल्य बिल्डर्स ग्रुप ही कंपनीस्थापन करून राऊ येथे प्रेस्टीज व उमरीखेडा येथे शिव रेसिडेन्सी-२ नावाने ले-आऊट टाकले. त्यांनी दोन वर्षात ले-आऊट विकसितकरून भूखंडाचे विक्रीपत्र करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे पीडितांनी २०१३ मध्ये त्या ठिकाणी भूखंड खरेदी केले. परंतु, त्यांना सहा वर्षांनंतरही विकसित भूखंडाचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

‘रेरा’च्या आदेशाचे पालन नाही

पीडितांनी ‘रेरा’कडेही तक्रार नोंदवली होती. ‘रेरा’ने पीडितांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला. परंतु, गाडगे यांनी त्याचे पालन केले नाही. त्यांनी शिव रेसिडेन्सी-२ मधील ७५० भूखंडधारकांना फसवले. त्यांनी रहिवासी उपयोगाची जमीन नसतानाही त्यावरील भूखंड विकले व फसवणूक केली. त्यांनी या प्रकल्पाची ‘रेरा’मध्ये नोंदणी केली नाही, असाही तक्रारकर्त्यांचा आरोप आहे.

गुंतवणूकदारांना पैसे परत केले

सर्व प्रकल्प नियमानुसार विकसित केले आहेत. शिव रेसिडेन्सी-२ प्रकल्पाकरिता काही परवानगी घेतल्या नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. प्रकल्पातील गुंतवणूकदारांना गेल्या सहा दिवसांत एक कोटी रुपये परत केले आहेत. काही जण व्याजाची मागणी करीत आहेत.- प्रफुल्ल गाडगे

टॅग्स :nagpurनागपूर