प्रदीप आगलावे यांची चौथ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
By Admin | Updated: November 18, 2015 03:24 IST2015-11-18T03:24:44+5:302015-11-18T03:24:44+5:30
प्रसिद्ध साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. आंबेडकर ...

प्रदीप आगलावे यांची चौथ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
नागपूर : प्रसिद्ध साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांची परभणी येथे होणाऱ्या चौथ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बौद्ध साहित्य परिषदेच्यावतीने मागील चार वर्षांपासून साहित्य संमेलने आयोजित केली जात आहेत. यापैकी पहिले तीन साहित्य संमेलने केज (बीड), उस्मानाबाद आणि लातूर येथे झाली. पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे होते तर दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर आणि तिसऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी भूषविले होते. यावर्षी मराठवाड्यात दुष्काळ असल्यामुळे हे संमेलन केवळ एक दिवसाचे म्हणजे ३ डिसेंबर २०१५ रोजी परभणी येथे होणार आहे. डॉ. आगलावे यांची चौथ्या बौद्ध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. यशवंत मनोहर यांनी त्यांचे अभिनंदन केले.