शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना; टोल वाचविण्यासाठी शोधला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 10:38 AM

नागपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ते उखडले आहेत.

ठळक मुद्देबनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळअंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

फहीम खान।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ते उखडले आहेत. ‘लोकमत’चमूने या परिसराची पाहणी केली असता, पेवठा ते बनवाडी मार्गावर बनविण्यात आलेला टोल नाका वाचविण्याच्या प्रयत्नात जड वाहनांची वर्दळ या रस्त्यांवर वाढली आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांत या परिसरातील रस्ते नादुरुस्त झाले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.हजारो रुपयांची बचतटोल नाक्यावर ट्रक चालकांकडून ८०० रुपये एका फेरीचे घेतले जातात. या रस्त्यावरून दिवसभरात एकाच कंपनीचे डझनभर ट्रक ये-जा करीत असतात. त्यामुळे टोलसाठी हजारो रुपये खर्च करावे लागात. परंतु जेव्हापासून झरी मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू केली तेव्हापासून हजारो रुपयांच्या टोल टॅक्सची बचत होत असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले.बॅरिकेडस् तोडलेटोल वाचविण्याच्या प्रयत्नात या रस्त्यावरून जड वाहनांची झरी रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. याचा विचार करता स्थानिक नागरिकांनी बनवाडी गावाच्या वळणावर बॅरिकेडस् लावले होते. परंतु वाहन चालकांनी लोखंडी बॅरिकेडस् काढून टाकले. आता या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक बेरोक-टोक वाहतूक सुरू आहे. बनवाडी पंचायतकडे ग्रामस्थांनी याची तक्रार केली होती. परंतु पंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बनविण्यात आलेला रस्ता नादुरुस्त झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत.पाच वर्षांच्या देखभालीला अर्थच काय?प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या रस्त्यावर फलक लावण्यात आला आहे. यावर रस्त्याची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असल्याचे लिहिले आहे. परंतु २०१४ ला बनविण्यात आलेल्या या रस्त्याची तीन वर्षातच अवस्था गंभीर झालेली आहे. रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडली आहे. जागोजागी खड्डे आहेत. असे असूनही कंत्राटदार दुरुस्ती करीत नाही. यासंदर्भात संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. परंतु कंत्राट देताना असलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित कंत्राटदार रस्त्याची देखभाल व दुरुस्ती का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक