दर्यापूरच्या प्रबोधन विद्यालय कार्यालयाला भीषण आग

By Admin | Updated: June 7, 2017 13:29 IST2017-06-07T13:29:03+5:302017-06-07T13:29:03+5:30

दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाच्या कार्यालयाला ल्याची मंगळवारी मध्यरात्रीनंतर उआग लागघडकीस आली

Prabodhan Vidyalaya office of Daryapur | दर्यापूरच्या प्रबोधन विद्यालय कार्यालयाला भीषण आग

दर्यापूरच्या प्रबोधन विद्यालय कार्यालयाला भीषण आग

आॅनलाईन लोकमत.

अमरावती: दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाच्या कार्यालयाला ल्याची मंगळवारी मध्यरात्रीनंतर उआग लागघडकीस आली आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, मूर्तीजापूर मार्गावर असलेले प्रबोधन विद्यालयात मंगळवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजताच्या दरम्यान आग लागल्याची माहिती येथील रात्रपाळीतील शिपायाला मिळाली. त्याने आसपासच्या लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान काही लोकांनी आगीची माहिती पोलिसांना व अग्नीशमन विभागाला दिली. अग्नीशमन दलाच्या दोन बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत कार्यालयातील झेरॉक्स मशीन, दोन कॉम्प्यूटर व इतर महत्त्वाचे दस्तऐवज (रेकॉर्ड) जळून खाक झाले.
मुख्याध्यापिका मेघा धर्माधिकारी यांना माहिती मिळताच त्या शाळेत हजर झाल्या. दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणून घेतली.

Web Title: Prabodhan Vidyalaya office of Daryapur