वीज कर्मचाऱ्यांचे उद्या काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:25+5:302021-05-23T04:07:25+5:30
नागपूर : वीज कर्मचारी, अभियंता संघटना, संयुक्त कृती समितीने येत्या २४ मे रोजी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

वीज कर्मचाऱ्यांचे उद्या काम बंद आंदोलन
नागपूर : वीज कर्मचारी, अभियंता संघटना, संयुक्त कृती समितीने येत्या २४ मे रोजी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. वीज कर्मचाऱ्यांना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात यावा व मेडीक्लेम पॉलिसीचे टीपीए बदलावे या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे.
कृती समितीशी संबंधित संघटनांच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांनी निदर्शनेही केली आहेत. समितीचे म्हणणे आहे की, कोविड संक्रमणकाळात कोविड रुग्णालयापासून ते पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईन आणि घरांना अखंडित वीज पुरवठा करण्यात आला. यादरम्यान ४०० वीज कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. हजारो कर्मचारी बाधित झाले. परंतु त्यांना फ्रंट लाईन वर्कर्स मानले गेले नाही.