शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

विदर्भातील ५,८०८ शेतकऱ्यांना वीजपुरवठा : ३,०१७ किमी लांबीची वीजवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 20:30 IST

शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतात सिंचनासाठी शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने महावितरणतर्फे जाहीर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणाली(एचव्हीडीएस)च्या कामांनी आता चांगलाच वेग घेतला असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या संपूर्ण विदर्भात आतापर्यंत सुमारे ५,८०८ शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. यासाठी तब्बल ३,०१७ किमी लांबीची उच्चदाब वितरण वाहिनी उभारण्यात आली आहे.

ठळक मुद्देउच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या कामांना गती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शेतात सिंचनासाठी शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने महावितरणतर्फे जाहीर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणाली(एचव्हीडीएस)च्या कामांनी आता चांगलाच वेग घेतला असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या संपूर्ण विदर्भात आतापर्यंत सुमारे ५,८०८ शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे. यासाठी तब्बल ३,०१७ किमी लांबीची उच्चदाब वितरण वाहिनी उभारण्यात आली आहे.पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे २०१७ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या अभिनव संकल्पनेला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी गती दिली. त्यानुसार मार्च २०१८ अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या विदर्भातील ४२ हजार शेतकऱ्यांसह राज्यातील २ लाख २४ हजार शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी सरासरी २ लाख ५० हजार रुपयांचा अंदाजित खर्च येणार असून, यापेक्षा अधिक खर्च येणाऱ्या राज्यातील तब्बल ३३ हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.संपूर्ण राज्यात उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्याकरिता ५ हजार ४८ कोटींचा खर्च होणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने १० व १६ केव्हीएचे सुमारे १ लाख ३० हजार इतक्या मोठ्या प्रमाणात रोहित्र लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी सामान व साहित्याची पूर्वतयारी करणे अशा काही तांत्रिक अडचणीमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत थोडा विलंब झालेला आहे.राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. या प्रणालीची कामे जलद व उच्चदर्जाची व्हावीत यासाठी महावितरणने देशभरातील नामांकित कंपन्यांना आवाहन केले असून व्होल्टाससहित नामांकित कंपन्यांनी प्रणालीच्या निविदांना मोठा प्रतिसाद दिला आहे. राज्यात ही योजना फुल-टर्न की व पार्शियल-टर्न की अशा दोन प्रकारे राबविण्यात येत असून विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ही कामे फुल-टर्न की तत्त्वावर देण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महावितरण रोहित्रे देणार असून उर्वरित कामे एजन्सींना करावयाची आहेत. यामध्ये ६०० एजन्सींना कामे मिळाली आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये रोहित्रांसह १०० टक्के कामे एजन्सीना देण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार असून या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्च-२०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.विदर्भातील एकूण ५ हजार ८०८ शेतकऱ्यांना उच्चदाब वीज जोडणी देण्यात आल्या असून तब्बल ८ हजारावर वितरण रोहित्रे उभारण्यात आली आहेत. उर्वरित कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.जिल्हा वीज पुरवठा मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्याअकोला ७४३बुलडाणा ७१६वाशीम ५७१अमरावती ५४४यवतमाळ ८४६चंद्र्रपूर २९१गडचिरोली २३३भंडारा ३६९गोंदिया ५५१नागपूर ६८८वर्धा २५६----------------एकूण ५,८०८

टॅग्स :FarmerशेतकरीelectricityवीजVidarbhaविदर्भ