अनेक भागातील वीज पुरवठा उद्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:07 IST2021-05-18T04:07:15+5:302021-05-18T04:07:15+5:30

नागपूर : वीज यंत्रणेच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवारी शहरातील बिनाकी, मस्कासाथ, वर्धमाननगर, कळमना या भागातील ...

Power supply in many areas will be cut off tomorrow | अनेक भागातील वीज पुरवठा उद्या बंद

अनेक भागातील वीज पुरवठा उद्या बंद

नागपूर : वीज यंत्रणेच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवारी शहरातील बिनाकी, मस्कासाथ, वर्धमाननगर, कळमना या भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे, असे महावितरणच्या वतीने कळविण्यात आले आहे. सकाळी ८ वाजतापासून सकाळी ११ वाजेपर्यंत अंबेनगर, दुर्गानगर, भरतवाडा रोड, सकाळी ७ वाजतापासून सकाळी ११ वाजेपर्यंत : डिप्टी सिग्नल एरिया, सकाळी ६ वाजतापासून सकाळी ९ वाजेपर्यंत : कांजी हाऊस व जोशीपुरा, विनोबा भावेनगर, वनदेवीनगर व राजीव गांधीनगर, सकाळी ८ वाजतापासून सकाळी १२ वाजेपर्यंत : वाजपेयीनगर, गौरीशंकरनगर, शनी मंदिर, काली माता मंदिर व कळमना नाका ४ तसेच मस्कासाथ, परवारपुरा, गुडगंज गली, अनाज बाजार, भंडारा रोड इतवारी या भागातील वीज पुरवठा सकाळी ११.३० वाजतापासून दुपारी १.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच मोमीनपुरा, टिमकी, तकिया या भागातील वीज पुरवठा सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

Web Title: Power supply in many areas will be cut off tomorrow