शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

वातावरण बदलले की वीज पुरवठा खंडित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 01:20 IST

वातावरणात बदल झाल्याने वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब झाली आहे. शहराची वीज वितरण व्यवस्था हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नसल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे कंपनी दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर तासन्तास वीज पुरवठा खंडित ठेवते. वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह : ऑनलाईन अभ्यासासाठी होतेय अडचण

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : वातावरणात बदल झाल्याने वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब झाली आहे. शहराची वीज वितरण व्यवस्था हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नसल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे कंपनी दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर तासन्तास वीज पुरवठा खंडित ठेवते. वीज पुरवठा खंडित झाल्याने त्याचा फटका ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो आहे.बुधवारी वीज खंडित झाल्याचा फटका बुटीबोरीतील लोकांनादेखील बसला. दुपारी २.२० वाजता वीज गेली आणि रात्री ७.३० ला आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते वातावरण बदल झाल्याने असे घडले आहे. एका हॉटेल जवळ ३ इन्सुलेटर डिस्क फुटले. चौकातसुद्धा एक इन्सुलेटर डिस्क फुटली. काही दिवसांपूर्वी पावसामुळे इन्सुलेटरचे नुकसान झाल्याने बराच वेळ वीज खंडित झाली होती. परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. लोकांचे म्हणणे आहे की, ग्रामीण भागात कंपनीचे लक्ष नाही. सर्व कारभार रामभरोसे सुरू आहे. यासंदर्भात कंपनीने वातावरणातील बदलाचे कारण सांगून हात वर केले. त्यांचे म्हणणे आहे की पाऊस जोरदार झाला. वीजसुद्धा कोसळली. कंपनीने तात्काळ दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन