वीज क्षेत्रातील संघटनाच कंत्राटदाराच्या भूमिकेत

By Admin | Updated: May 21, 2014 01:01 IST2014-05-21T01:01:10+5:302014-05-21T01:01:10+5:30

वीज क्षेत्रात कार्यरत विविध कामगार-कर्मचारी संघटनांपैकी काही संघटना कंत्राटदाराच्या भूमिकेत वावरत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. काही संघटनांनी लेबर कॉन्ट्रॅक्ट

The power sector organization is the role of contractor | वीज क्षेत्रातील संघटनाच कंत्राटदाराच्या भूमिकेत

वीज क्षेत्रातील संघटनाच कंत्राटदाराच्या भूमिकेत

यवतमाळ : वीज क्षेत्रात कार्यरत विविध कामगार-कर्मचारी संघटनांपैकी काही संघटना कंत्राटदाराच्या भूमिकेत वावरत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. काही संघटनांनी लेबर कॉन्ट्रॅक्ट घेतले असल्याचे वृत्त ‘प्रकाशगड’मधून बाहेर आले आहे. वीज कामगारांच्या विविध प्रश्नांवर संघटनांकडून नेहमीच चर्चा, करार व वेळप्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. अनेक संघटना कामगार-कर्मचार्‍यांसाठी प्रामाणिकपणे लढा देत असताना काही संघटना मात्र आपल्या ठेकेदारी प्रवृत्तीतून या प्रामाणिक लढ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. काही संघटनांनी वेगवेगळया नावावर स्वत:च लेबर कॉन्ट्रॅक्ट घेतले आहेत. वीज कंपन्यांना या माध्यमातून कंत्राटी कामगारांचा पुरवठा केला जात आहे. कंपन्यांवर दबाव कायम रहावा, त्यातून कंत्राट मिळावे, जुने कंत्राट पुढेही सुरू राहावे म्हणून अधूनमधून अशा संघटनांकडून आंदोलनाचे इशारे दिले जातात. कामगार-कर्मचार्‍यांसाठी लढण्याचा हक्क संघटनांना निश्चितच आहे. परंतु जे कामगार-कर्मचारी अद्याप कंपनीत रुजूच झाले नाहीत त्यांच्यासाठी संघटनांचा लढा कशासाठी, असा प्रश्न वीज वितरण कंपनीच्या उच्चपदस्थांकडून उपस्थित केला जात आहे. कंत्राटी कामगारांना कायम करता येत नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असताना व त्यावर शासनाने परिपत्रक काढले असताना संघटनांच्या मागण्या मान्य करायच्या कशा असा प्रश्न प्रकाशगडमधून उपस्थित करण्यात आला आहे. संघटनांच्या याच स्वार्थापायी प्रकरणे न्यायालयापर्यंत जात असून त्याचा उमेदवारांना फायदा कमी आणि नुकसान अधिक होत असल्याचे सांगण्यात आले. अलिकडेच अशा एका प्रकरणात उमेदवारांना वीज कंपनीत रुजू होण्यास तब्बल दीड वर्ष विलंब लागला. वीज कंपन्यांमध्ये नोकरीसाठी धडपडणार्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना ‘तुमच्या हक्कासाठी लढतोय’ असे दाखवून आपल्या गळाला लावण्याचा व नंतर त्यांची शक्ती संघटनेच्या आंदोलनांसाठी वापरण्याचा फंडा काही संघटनांनी सुरू केल्याचा आरोप होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The power sector organization is the role of contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.