वीज केंद्रातील कंत्राटी कामगार बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST2020-12-30T04:13:20+5:302020-12-30T04:13:20+5:30
खापरखेडा : स्थानिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगार मंगळवार (दि. २९) सकाळपासून बेपत्ता आहे. त्याने आत्महत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त ...

वीज केंद्रातील कंत्राटी कामगार बेपत्ता
खापरखेडा : स्थानिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगार मंगळवार (दि. २९) सकाळपासून बेपत्ता आहे. त्याने आत्महत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केल्याने त्याचा तलावात शाेध घेण्यात आला. मात्र, ताे तलावात आढळला नाही.
जितेंद्र भुसारी (३५, रा. वाॅर्ड क्रमांक-३, खापरखेडा, ता. सावनेर) हा खापरखेडा वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून काम करताे. ताे मंगळवारी सकाळी कुणालाही न सांगता घरून निघून गेला. काेराडी मंदिर परिसरातील तलावाच्या काठी त्याच्या चपला आढळून आल्याने त्याने तलावात आत्महत्या केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला हाेता. खापरखेडा पाेलिसांच्या सूचनेवरून काेराडी पाेलिसांनी दाेघांच्या मदतीने तलावात त्याचा शाेध घेतला. मात्र, ताे तलाव व परिसरात आढळून आला नाही. काेराडी पाेलिसांनी ताे बेपत्ता असल्याची तक्रार देखील स्वीकारली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी खापरखेडा पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. ताे घरून का निघून गेला, याचे कारण कळू शकले नाही. त्याने इतरांकडून व्याजाने पैसे घेतले आहे, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.