शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेच्या ३०० शाळांची बत्ती गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:20 IST

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा वाऱ्यावर सोडल्यागत चित्र आहे. शाळेमध्ये विजेच्या धक्का लागून दोन विद्यार्थ्यांनी जीव गमावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा भोंगळपणा उघडकीस आला आहे. शाळांचे वीज बिल थकल्याने ३०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अशा अनेक शाळा गरजेपुरती अनधिकृत वीज जोडण्या घेत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देथकबाकींची पुन्हा डोकेदुखीअनधिकृत वीज जोडणीचा सुळसुळाटजिल्ह्यात दोन विद्यार्थीही दगावले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा वाऱ्यावर सोडल्यागत चित्र आहे. शाळेमध्ये विजेच्या धक्का लागून दोन विद्यार्थ्यांनी जीव गमावल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा भोंगळपणा उघडकीस आला आहे. शाळांचे वीज बिल थकल्याने ३०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अशा अनेक शाळा गरजेपुरती अनधिकृत वीज जोडण्या घेत असल्याची माहिती आहे.पंचायत समिती रामटेक अंतर्गत जुनेवाणी येथील प्राथमिक शाळेत १३ जुलै रोजी शाळा भरण्यापूर्वी आवारात खेळताना अमन धुर्वे नावाच्या विद्यार्थ्याला विजेचा धक्का लागून त्याचा अंत झाला तर १७ जुलै रोजी पं.स.हिंगणा अंतर्गत असलेल्या जि.प.प्राथमिक शाळा दाभा येथे सायंकाळी ६ वाजता आदित्य राठोड हा विद्यार्थी शाळेच्या छतावर चढला असता वरून जाणाऱ्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही शाळांची वीज जोडणी स्थिती, शाळा इमारतीची परिस्थिती विजेच्या दृष्टीने सुरक्षित नव्हती, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. जुनेवाणी येथील शाळेची वीज जोडणी ही थकीत वीज बिलापोटी खंडित करण्यात आली आहे. या ठिकाणी शाळेच्या शेजारी असलेल्या घरून वीज घेण्यात आली होती.नागपूर जिल्ह्यात थकीत वीज बिलापोटी जि.प.च्या ३०० च्या जवळपास शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. काही शाळांची तर थकबाकी ५० हजारावर आहे. याबाबत वारंवार चर्चा होते. परंतु त्यावर कोणताही तोडगा निघत नाही. राज्य शासन असो की जि.प. प्रशासन कुणीही या बाबींची दखल घेताना दिसत नाही. शाळेत वीज नसतानाही डिजिटल स्कूलच्या नावाखाली विजेची पर्यायी व्यवस्था करण्याच्या मौखिक सूचना स्थानिक पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांकडून दिल्या जातात. अनेक शाळा इमारतींचे विद्युत परीक्षण सुद्धा कधीही करण्यात येत नाही. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दोन घटनांमुळे पालकांमध्ये सुद्धा भीती आहे. वर्षाला मिळतो ५ हजाराचा निधीजि.प. च्या शाळांना वर्षाला पाच हजार रुपये निधी मिळतो. परंतु हा निधी १३५ बाबींवर खर्च करायचा असतो. पूर्वी जि.प.च्या शाळांचे वीज बिल व्यावसायिक दराने यायचे. आता संस्थेच्या दराने वीज बिल येत आहे. तरी सुद्धा महिन्याला शाळेला किमान ५०० रुपये वीज बिल येत आहे. ५ हजार रुपयांमध्ये वीज बिल भरणे शक्य नाही. १ लाखाचा निधी शाळेतच पडूनसप्टेंबर २०१६ च्या आकडेवारीनुसार जि.प.ने वीज जोडण्या पूर्ववत करण्यासाठी १ लाख रुपयांचा निधी २४२ शाळांमध्ये वाटप केला होता. यातून प्रत्येक शाळेला केवळ ४१४ रुपये मिळाले. वीज बिल मोठ्या प्रमाणात थकीत असल्यामुळे ४१४ रुपये शाळेच्या खात्यात तसेच पडून आहे. प्रशासनाने करावी आर्थिक तरतूदजि.प.शाळांमधील वीजबिल भरण्याकरिता कोणतीही स्वतंत्र आर्थिक तरतूद नाही. ती व्हायला पाहिजे. शिवाय प्रत्येक शाळा इमारतीचे विद्युत परीक्षण करणे गरजेचे आहे. तशी मागणी देखील जि.प.सीईओेंकडे नुकतीच करण्यात आली असल्याचे नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूर