वीज कृषी ग्राहकांचा रोपटे देऊन सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:51+5:302021-02-05T04:42:51+5:30
गुमगाव : नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरण अंतर्गत महावितरण केंद्र गुमगाव येथील अरुण दादाजी देवतळे व अमित प्रकाश ...

वीज कृषी ग्राहकांचा रोपटे देऊन सत्कार
गुमगाव : नवीन कृषी पंप वीज जोडणी धोरण अंतर्गत महावितरण केंद्र गुमगाव येथील अरुण दादाजी देवतळे व अमित प्रकाश देवतळे या कृषी वीज ग्राहकांनी बिलाची थकबाकी रक्कम (५० टक्के वीज बिल माफीचा फायदा घेऊन) सर्वप्रथम वीज बिल भरून सहकार्य केले. याबद्दल या दोन्ही कृषी वीज ग्राहकांचा फळाचे रोपटे देऊन गुमगाव महावितरणचे कनिष्ठ अभियंता रुपेश कापसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गुमगाव महावितरण अंतर्गत १०८८ कृषी वीज ग्राहक असून ‘एक गाव एक दिवस’ या विशेष उपक्रमाच्या तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक दिलीप सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बाबा लांजेवार आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थित होती.