शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

पोस्टमास्तरचा शेजारद्वेष डाक विभागाला भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 1:55 PM

दोन शेजाऱ्यातील भांडण केव्हा, कुठल्या वळणावर जाईल याचा नेम राहिला नाही. पोलीस, कोर्ट, प्रसंगी हातापायीवर प्रकरण जाते. अशाच एका प्रकारात युवकाला नोकरीच्या संधीपासून दूर राहावे लागले, तर दुसरीकडे डाक विभागालाही दणका बसला.

ठळक मुद्देमुलाखतीच्या दिवशी दिले पत्रयुवकाची नोकरीची संधी हुकली

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दोन शेजाऱ्यातील भांडण केव्हा, कुठल्या वळणावर जाईल याचा नेम राहिला नाही. पोलीस, कोर्ट, प्रसंगी हातापायीवर प्रकरण जाते. अशाच एका प्रकारात युवकाला नोकरीच्या संधीपासून दूर राहावे लागले, तर दुसरीकडे डाक विभागालाही दणका बसला.महागाव तालुक्याच्या कासोळा येथे झालेला प्रकार अचंबित करणारा आहे. या गावातील शाखा पोस्टमास्तरने आपल्या कर्तव्यात ‘वाद’ आडवा आणला. डाक विभागाची प्रतिमा मलीन केली. यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयाने या विभागाला दणका दिला आहे. तक्रारकर्त्याला सदोष सेवा, शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी २५ हजार रुपये आणि तक्रार खर्चाचे तीन हजार रुपये देण्याचा आदेश दिला आहे. मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे आणि सदस्य सुहास आळशी यांच्या उपस्थितीत सदर प्रकरण चालविण्यात आले.कासोळा येथील आकाश देवराव पाईकराव यांनी फायरमन या पदासाठी अर्ज भरला होता. संबंधित विभागाने त्यांना रजिस्टर पोस्टाद्वारे मुलाखतपत्र पाठविले. रजिस्टर पोस्ट पुसद आणि तेथून शाखा डाकघर कासोळा येथे पोहोचले. शाखा पोस्टमास्तर आकाशचा शेजारी आहे. तेथेच सारा घोळ झाला. पाईकरावच्या नावाने असलेले पाकीट खालून फोडून तपासले गेले. त्यात असलेल्या कागदाचीही चाचपणी केली.आकाशची मुलाखत २७ तारखेला नाशिक येथे होती. कासोळा शाखा डाकघरात २५ रोजीच रजीस्टर पोहोचले. आकाशच्या हाती मुलाखतीच्या दिवसावर पाकीट देण्यात आले. हा प्रकार जाणिवपूर्वक केल्याचे ग्राहक न्यायालयात चाललेल्या कारवाई दरम्यान सिध्द झाले. केवळ द्वेषामुळे आकाशला नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागले. अधीक्षक डाकघर यवतमाळ, उपडाकरघर पुसद आणि बँ्रच पोस्टमास्तर कासोळा यांनी आकाश पाईकराव यांना नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे व सदस्य सुहास आळशी यांनी दिला.शेजारी घरी नव्हताआकाश पाईकराव यांनी जिल्हा ग्राहक न्यायालयात भरपाईसाठी तक्रार दाखल केली. प्रकरणावर कारवाई सुरू झाली. डाक विभागाने लेखी जवाब दाखल केला. आकाश घरी नव्हता, रविवार आला त्यामुळे पत्र देण्यास विलंब झाला, असे त्यात नमूद केले. शाखा पोस्टमास्तरने आकाशच्या कुटुंबातील लोकांना पत्र द्यावयास पाहिजे होते. या प्रकरणात पोस्टमारस्तरचा निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणा सिध्द होत असल्याचे मंचने आपल्या निकालात म्हटले आहे. आकाश पाईकराव यांनी १८ लाख रुपये नुकसान भरपाई मागितली होती.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस