शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

सरसंघचालकांनी वर्तविली पाकिस्तानच्या फाळणीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 11:06 PM

आपल्या हक्काचा सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेल्याचे दु:ख सिंधी बांधवांमध्ये कायम असून ते १४ आॅगस्ट रोजी काळा दिवस साजरा करतात. मात्र पुढील २०-३० वर्षात चित्र बदलू शकते. हेच सिंधी बांधव प्रत्यक्ष सिंध भूमीवर उभे राहून गौरव दिवस साजरा करु शकतील, अशी शक्यता सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी वर्तविली.

ठळक मुद्देसिंध प्रांतात सिंधी बांधव करतील गौरवदिन साजरा : सिंधी संस्कृतीचे संवर्धन व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या हक्काचा सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेल्याचे दु:ख सिंधी बांधवांमध्ये कायम असून ते १४ आॅगस्ट रोजी काळा दिवस साजरा करतात. मात्र पुढील २०-३० वर्षात चित्र बदलू शकते. हेच सिंधी बांधव प्रत्यक्ष सिंध भूमीवर उभे राहून गौरव दिवस साजरा करु शकतील, अशी शक्यता सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी वर्तविली. अप्रत्यक्षपणे भविष्यात पाकिस्तानची फाळणी होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी या माध्यमातून बोलून दाखविली. भारतीय सिंधू सभेद्वारे श्री झुलेलाल भगवान यांचा जन्मोत्सव चेट्रीचंड्र साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान सोमवारी ते बोलत होते.जरीपटका येथील दयानंद पार्क येथे आयोजित या कार्यक्रमाला भारतीय सिंधू सभा अध्यक्ष घनश्यामदास कुकरेजा,मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेन्द्र कुकरेजा, अशोक केवलरामानी प्रामुख्याने उपस्थित होते. सिंधी बांधवांना शरणार्थी म्हणून संबोधले जाते. मात्र ते शरणार्थी नाहीत. संपूर्ण देश त्यांचेदेखील घर आहे. आपल्या राष्ट्रगीतातदेखील ‘सिंध’ शब्द आहे. १४ आॅगस्टच्या वेदना त्यांच्या मनात कायम आहेत. मात्र त्यांचा पुरुषार्थ व परमार्थ यांच्या बळावर आपल्या हक्काच्या सिंध प्रांतात उभे राहून १४ आॅगस्ट हा दिवस ते गौरवदिवस साजरे करु शकतील, अशी शक्यता डॉ.भागवत यांनी वर्तवली. आपल्या देशात सिंधू-सरस्वती संस्कृती आजही टिकून आहे. सिंधी भाषा मजबूत झाली तर भारताच्या इतर भाषादेखील मजबूत होतील. या भाषेची सुरक्षा म्हणजे देशाच्या संस्कृतीची सुरक्षा आहे. सिंधी समाजाचे योग्य संवर्धन झाले पाहिजे. यासाठी भाषा, वेषभूषा, भवन, भजन, भ्रमण आणि भोजन यांची परंपरा कायम राखली पाहिजे, असेदेखील ते म्हणाले. घनश्यामदास कुकरेजा यांनी प्रास्ताविक केले. संगीता सचदेव यांनी संचलन केले.कुटुंबामध्ये मातृभाषेतूनच संवाद साधावाआजच्या काळात मातृभाषेची चिंता करण्याची वेळ आली आहे. जर आपली मातृभाषा टिकली तर इतर भाषादेखील टिकतील. त्यामुळे कुटुंबामध्ये संवाद साधताना मातृभाषेचाच वापर झाला पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी सरसंघचालकांनी केले.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत