शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 11:54 IST

पावसाळा आता संपत आला आहे. विभागातील मोठी जलाशये कोरडी आहेत. जलाशयांमध्ये केवळ ४६.२४ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाईचा धोका

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळा आता संपत आला आहे. विभागातील मोठी जलाशये कोरडी आहेत. जलाशयांमध्ये केवळ ४६.२४ टक्के इतकाच साठा शिल्लक आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने विहिरीतील पाण्याची पातळी आधीच खोल गेली आहे. तेव्हा येत्या काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास भविष्यात पूर्व विदर्भात दुष्काळाचा धोका निर्माण झाला आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठी जलाशये आहेत. यांची एकूण पाणीसाठा क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी आहे. या आजच्या घडीला (१ आॅक्टोबर रोजी नोंदविल्यानुसार) केवळ १६४३.३९ दलघमी म्हणजेच ४६.२४ टक्के इतका साठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील मोठ्या जलशयामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह प्रकल्पाची साठा क्षमता १०१६.८८ दलघमी इतकी आहे. त्यात केवळ ३०५.१८ म्हणजेच ३०.०१ टक्के इतका साठा आहे. कामठी खैरीमध्ये ३८.१२ टक्के, रामटेकमध्ये ४५.३९ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील सिरपूरमध्ये ६७.८९ टक्के, इटियाडोह ५२.७२ टक्के, पुजारीटोला ७१.९५ टक्के, कालीसरार ६०.२४ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा-२ मध्ये ३७.२१ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ८६.९३ टक्के, गडचिरोलीतील दीना प्रकल्पात ६९.१३ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर धरणात ३१.६१ टक्के, धाम प्रकल्पात ४०.७३ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ मध्ये ३१.४६ टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द ४९.८२ टक्के, बावनथडी ४६.८२ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा पाहता पाण्याच्या नियोजनाचा विचार केल्यास नागपूर विभागात तीव्र पाणीटंचाईचा धोका आहे.वणा-पोथरा १०० टक्के भरले१८ मोठ्या प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील केवळ लोवर नांद, वणा आणि वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परंतु या धरणाची एकूण साठाक्षमताच कमी आहे. लोवर नांद, वणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ५३ दलघमी इतकी आहे. तर पोथरा प्रकल्पाची एकूण पाणीसाठा क्षमता केवळ ३५ दलघमी इतकी आहे. त्यामुळे ती पूर्ण भरली असली तरी भविष्यातील टंचाईचा सामना करण्यास पुरेशी ठरणार नाही.

प्रचंड मोठा दुष्काळ पडू शकतोपावसाळ्यात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी आधीच खाली गेली आहे. विदर्भातील बहुतांश शेती ही विहिरीवरच अवलंबून आहे. त्यामुळे पिकांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. खरीपातील काही पिके निघून जतील. परंतु रबीची पिके पाण्याअभावी नष्ट होतील. गहू, चणा, सूर्यफूल, फळबागा यांना मोठा फटका बसेल. कारण पिण्यासाठी पाणी ठेवले जाईल. शेतीला पाणी मिळणार नाही. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचीही मोठी टंचाई भासेल. येत्या काही दिवसात चंगला पाऊस झाला तर ठीक नाही तर प्रचंड मोठा दुष्काळ पडेल, हे निश्चित. यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.- श्रीधर ठाकरे , कृषितज्ज्ञ, अध्यक्ष-महाआॅरेंज

टॅग्स :droughtदुष्काळ