शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

CoronaVirus in Nagpur : मुंबईहून आलेली व्यक्ती पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या ३७४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:50 PM

मुंबई येथून नागपुरात आलेला रुग्णाचा नमुना मंगळवारी पॉझिटिव्ह आला. प्रवासावरील निर्बंध शिथिल झाल्याने रुग्ण वाढणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या ३७४ झाली आहे.

ठळक मुद्देआणखी १८ रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई येथून नागपुरात आलेला रुग्णाचा नमुना मंगळवारी पॉझिटिव्ह आला. प्रवासावरील निर्बंध शिथिल झाल्याने रुग्ण वाढणार तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या रुग्णासह कोरोनाबाधितांची संख्या ३७४ झाली आहे. हा रुग्ण नारा संतोषीनगर वसाहतीतील आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर आणखी एका नव्या वसाहतीचा भार वाढला आहे. मेडिकलमधून आज पुन्हा १७ तर मेयोतून एका रुग्णाला सुटी देण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २९० झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर ग्रीन झोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली. हे पाचही रुग्ण मुंबई येथून आले होेते. एवढेच नव्हे तर ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू असलेल्या बुलडाण्यातही दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून आलेली महिला पॉझिटिव्ह आली. भंडारा व यवतमाळमध्येही असेच प्रकरण समोर आले आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. आज पॉझिटिव्ह आलेली ४५ वर्षीय व्यक्ती सोमवारी मुंबईवरून नागपुरात आली. ती नारा येथील संतोषीनगर येथील रहिवासी आहे. याची माहिती लोकांना झाल्यानंतर त्यांनी या व्यक्तीला मेयोमध्ये जाऊन तपासणी करून घेण्यास सांगितले. मेयोच्या कोविड ओपीडीमध्ये त्याची तपासणी केल्यावर त्याला ताप असल्याचे निदान झाले. शिवाय त्याची मुंबई प्रवासाची पार्श्वभूमी असल्याने भरती करून घेण्यात आले. आज त्याचा नमुना पॉझिटिव्ह आला. या प्रकरणावरून प्रवासावरून आलेल्या प्रत्येकाने तपसणी करून घेणे गरजेचे असल्याचे मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांचे म्हणणे आहे.कोरोनामुक्त झालेल्या महिलेची प्रसूतीमेयोमध्ये गेल्या १६ दिवसांपासून भरती असलेल्या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचे आज दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. रुग्णालयातून सुटीची प्रक्रिया सुरू असताना अचानक महिलेच्या पोटात दुखणे सुरू झाले. डॉक्टरांनी तिला तातडीने लेबर रूममध्ये नेले. तिने एका गोंडस बालकाला जन्म दिला. ही महिला मोमिनपुरा येथील राहणारी आहे.सहा वर्षांच्या मुलासह १८ रुग्णांनी केली कोरोनावर मातमेयोमधून एक तर मेडिकलमधून आज १७ असे एकूण १८ रुग्णांना नवीन डिस्चार्ज धोरणानुसार सुटी देण्यात आली. यात मोमिनपुरा येथील ६ वर्षाच्या मुलासह १३ पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. यातील बहुसंख्य रुग्ण मोमिनपुरा व सतरंजीपुरा येथील आहेत. या रुग्णांनी पुढील सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहण्याचे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे.पोलिसांच्या संपर्कातील ३५ नमुने निगेटिव्हकंटेन्मेंट झोन असलेल्या मोमिनपुरा येथे ड्यूटीवर असलेल्या तीन पोलिसांचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सदस्यांसह काही पोलिसांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ३५ वर नमुने निगेटिव्ह आले आहेत.आतापर्यंत ७,८७४ नमुने निगेटिव्हनागपुरात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण दिसून येऊ लागले तेव्हापासून ते आतापर्यंत ८,२४८ नमुने तपासण्यात आले. यातील ३७४ नमुने पॉझिटिव्ह आले असून ७,८७४ नमुने निगेटिव्ह आले. मंगळवारी तपासण्यात आलेल्या ४७५ नमुन्यांमध्ये केवळ एक नमुना पॉझिटिव्ह आला. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित ५९६दैनिक तपासणी नमुने ४७५दैनिक निगेटिव्ह नमुने ४७४नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३७४नागपुरातील मृत्यू ७डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण २९०डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २,१४०क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २,१३१पीडित-३७४-दुरुस्त-२९०-मृत्यू-७