शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंडहून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण दोन दिवस घरीच; महापालिका म्हणते उशिरा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 01:15 IST

महापालिका म्हणते उशिरा अहवाल : हुडकेश्वर रोड येथील रुग्ण रात्री मेडिकलमध्ये दाखल

नागपूर : अधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारातील संशयित रुग्णांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे आली आहेत. परंतु महापालिका प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. इंग्लंडहून नागपुरात परतलेली एक व्यक्ती २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत घरीच राहते. आरटीपीसीआर चाचणीचा अहवालही दोन दिवसांनंतर येतो; तर त्याचे ट्रेसिंग आणि मेडिकलमध्ये भरती करण्यास रात्रीचे १० वाजतात.

कोरोना विषाणूचे नवे रूप जास्त धोकादायक आणि संक्रमक आहे. यामुळे कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार इंग्लंड, युरोपीयन युनियन, मिडल ईस्ट व साउथ आफ्रिका येथून २५ नोव्हेंबरपासून ते २३ डिसेंबरदरम्यान नागपुरात परतलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे व अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तातडीने मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्याच्या सूचना आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, २३ डिसेंबरनंतर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याचा नियम आहे; परंतु प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे.

विठ्ठलवाडी हुडकेश्वर रोड येथील रहिवासी ३८ वर्षीय पुरुष इंग्लंडहून मुंबई येथे १९ डिसेंबर रोजी परतला. मुंबईहून ती व्यक्ती मध्यप्रदेश येथील पंचमढी येथे गेली. पाच दिवसांनंतर २५ डिसेंबर रोजी नागपुरात परतली. नियमानुसार या व्यक्तीला त्याच दिवशी संस्थात्मक अलगीकरणात पाठविणे आवश्यक होते. परंतु याची गरज कुणालाच वाटली नाही. २९ तारखेला या व्यक्तीने लॉ कॉलेज चौकातील केंद्रात जाऊन आरटीपीसीआर चाचणी केली; परंतु याचा अहवाल तब्बल दोन दिवसांनंतर ३१ डिसेंबर रोजी आल्याचे महापालिकेच्या संबंधित डॉक्टरने सांगितले.

विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून पाच हजारांखाली चाचण्या होत असताना व सर्व प्रयोगशाळा क्षमतेपेक्षा कमी चाचण्या करीत असताना अहवाल येण्यास लागणाऱ्या दोन दिवसांच्या कालावधीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातही अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यास रात्रीचे १० वाजले. या रुग्णाला सौम्य लक्षणे आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnagpurनागपूर