फेसबुकच्या बनावट अकाऊंटवर अश्लील फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:08 IST2021-05-11T04:08:55+5:302021-05-11T04:08:55+5:30

-५० हजारांची खंडणी मागितली - जीवे मारण्याची धमकी नागपूर : बनावट फेसबुक आयडी तयार करून त्यावर एका महिलेच्या मुलाच्या ...

Pornographic photos on a fake Facebook account | फेसबुकच्या बनावट अकाऊंटवर अश्लील फोटो

फेसबुकच्या बनावट अकाऊंटवर अश्लील फोटो

-५० हजारांची खंडणी मागितली

- जीवे मारण्याची धमकी

नागपूर : बनावट फेसबुक आयडी तयार करून त्यावर एका महिलेच्या मुलाच्या चेहऱ्यावर मुलीचा फोटो चिटकवून आरोपीने सक्करदऱ्यातील महिलेला अश्‍लील फोटो पाठवले. नंतर त्यांच्याशी संपर्क करून ही बनावट आयडी डिलिट करायची असेल तर ५० हजार रुपये द्यावे लागतील. अन्यथा अश्लील फोटो सर्वत्र व्हायरल करू, पोलिसांकडे या संबंधाने तक्रार केल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकीही संबंधित आरोपीने दिली. ५ ते ६ मे च्या दरम्यान हा प्रकार घडला. पीडित महिलेने सक्करदरा पोलिस ठाण्यात रविवारी तशी तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.

ओळखीच्या आरोपीकडूनच हा उपद्रव करण्यात आला असावा, असा संशय आहे. सायबर शाखेच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Pornographic photos on a fake Facebook account