महिला पोलिसांशी अश्लील संभाषण

By Admin | Updated: February 11, 2016 03:26 IST2016-02-11T03:26:21+5:302016-02-11T03:26:21+5:30

गेल्या काही दिवसांपासून नागपूर कंट्रोल रुमचा फोन सतत खणखणायचा. मात्र कंट्रोल रुममधील महिला पोलिसांना तक्रारीऐवजी...

Pornographic conversation with women police | महिला पोलिसांशी अश्लील संभाषण

महिला पोलिसांशी अश्लील संभाषण

दोन तरुण अटकेत : महागात पडली मस्करी
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून नागपूर कंट्रोल रुमचा फोन सतत खणखणायचा. मात्र कंट्रोल रुममधील महिला पोलिसांना तक्रारीऐवजी अश्लील संभाषण ऐकावं लागायचं. दररोजच्या या प्रकाराला कंट्रोल रुममधल्या महिला कर्मचारी पुरत्या वैतागल्या होत्या. अखेर पोलिसांनी निनावी फोन करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सूरज पाटील (२३) रा. झिल्पी लोहगड आणि अतुल वाहणे (२०) जरुड वाडा ता. कारंजा जि. वर्धा अशी अटक केलेल्या टवाळखोरांची नावं आहेत. याच दोघांनी नागपूर कंट्रोल रुममध्ये काम करणाऱ्या महिला पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. १ ते २२ जानेवारी या काळात दोघांनी तब्बल ५५ वेळा १०० नंबरवर फोन केला. पलीकडून महिलेचा आवाज आल्यास अश्लील संभाषण केलं. सुरुवातीला नियंत्रण कक्षात कार्यरत महिला पोलिसांनी दुर्लक्ष केले. मात्र, जेव्हा हे प्रकार वाढू लागले आणि अश्लील संभाषणाने परिसीमा गाठली, तेव्हा पीडित महिला पोलिसांनी महिला डीसीपी दीपाली मासीरकर यांच्याकडे सर्व प्रकार सांगितला. वरिष्ठांनी तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले.
आरोपी सूरज आणि अतुलने जणू नागपूर पोलिसांनाच आव्हान दिले होते. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्या जोडगोळीचे मोबाईल फोन ट्रेस केले. तांत्रिक तपासात अश्लील फोन येणाऱ्या नंबरचा शोध लागला आणि तो नंबर सूरज पाटील या युवकाचा निघाला. सूरज पाटील आणि त्याचा मित्र अतुल वाहणे हे दोघे नियंत्रण कक्षाला फोन लावायचे. महिला पोलिसांशी अश्लील संवाद साधायचे. मोबाईल नंबरच्या आधारावर पोलिसांनी दोघांना शोधून काढले. मंगळवारी रात्री पोलिसांनी दोघांना अटक केली. आरोपींचे आईवडील शेतकरी आहेत. सूरज पाटील आणि अतुल वाहणे दोघेही महाविद्यालयीन तरुण आहेत. ते मित्र असून नात्यात भाऊ लागतात. सूरज काटोलच्या एका महाविद्यालयात एमएससी पहिल्या वर्षाला आहे. तर अतुल काटोलमध्येच बीकॉम दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. या प्रकरणात शब्बीरखान रउफखाँ पठाण (३४, रा. नाका नं. २, कामठी रोड) यालासुद्धा अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

२४ तासात आरोपपत्र
नियंत्रण कक्षाचे फोन कायदा सुव्यवस्था सांभाळण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे १०० नंबरवर कॉल करून अशी मस्करी महागात पडू शकते, असा इशाराच पोलिसांनी दिला आहे. भविष्यात कोणीही १०० नंबरचा दुरुपयोग करू नये म्हणून नागपूर पोलीस सूरज आणि अतुलवर कडक कारवाई करणार आहेत. त्यादृष्टीने २४ तासाच्या आतच दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Web Title: Pornographic conversation with women police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.