‘पोर्न’ने होतेय बालमन उद्ध्वस्त

By Admin | Updated: August 24, 2016 02:37 IST2016-08-24T02:37:50+5:302016-08-24T02:37:50+5:30

सिनेमागृहात एखादा अश्लील चित्रपट प्रदर्शित होताच महिलांचा रोष उफाळून यायचा. त्यामुळे प्रदर्शनच रोखले जायचे.

'Porn' would have been destroyed by Balman | ‘पोर्न’ने होतेय बालमन उद्ध्वस्त

‘पोर्न’ने होतेय बालमन उद्ध्वस्त

अल्पवयीन मुलाकडून चिमुकलीवर अत्याचार : समाजमन सुन्न
नागपूर : सिनेमागृहात एखादा अश्लील चित्रपट प्रदर्शित होताच महिलांचा रोष उफाळून यायचा. त्यामुळे प्रदर्शनच रोखले जायचे. आता तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. त्यात व्हॉटस् अ‍ॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘पोर्न सिन’ सहजरीत्या व्हायरल होत आहे. ‘बच्चे कंपनी’ वर विपरीत परिणाम होऊन ते उद्ध्वस्त होत असल्याच्या धक्कादायक आणि समाजमन सुन्न करणाऱ्या घटना उघडकीस येत आहेत. पोर्न सिन पाहून अवघ्या दहा दिवसात बालकांनीच बालिकांवर अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. या दोन्ही घटना श्रमिकबहुल भागातील आहेत.

शांतिनगर भागात १३ वर्षाच्या मुलाने ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना पाच दिवसानंतर उजेडात आली. पोलिसांनी विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याची शासकीय बालसुधार गृहाकडे रवानगी केली.हा विधी संघर्षग्रस्त बालक पीडित मुलीच्या शेजारीच राहतो. त्याचे नेहमीच या मुलीच्या घरी येणे-जाणे होते. मुलगीही त्याच्याकडे खेळायला जायची.
विधी संघर्षग्रस्त बालक हा महाल भागातील एका शाळेतील नवव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. १७ आॅगस्टला पीडित मुलगी तिच्या आईसोबत बाहेर जात होती. परंतु आरोपीला बघताच ती रडायला लागली. घाबरून ती घरात पळाली. त्यामुळे आईला संशय आला. आईने मुलीला विचारपूस केल्यावर तिने घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. (प्रतिनिधी)

पीडितेच्या आईने शांतिनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवताच पोलिसांनी बलात्कार आणि बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. त्याला बाल न्यायालयात हजर करून त्याची बाल सुधारगृहाकडे रवानगी करण्यात आली.
पोलीस सूत्राच्या माहितीनुसार हा विधी संघर्षग्रस्त बालक शाळेच्या परिसरात आपल्या मित्रांसोबत मोबाईलवर पोर्न सिन (अश्लील व्हिडिओ क्लीप) पाहायचा. नेमकी अशाच प्रकारची घटना १२ आॅगस्ट रोजी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडून १३ वर्षीय मुलाने ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार केला. या वाढत्या प्रकारामुळे पीडित बालिका आणि खुद्द विधी संघर्षग्रस्त बालके उद्ध्वस्त होत आहेत.

Web Title: 'Porn' would have been destroyed by Balman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.