शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 23:15 IST

पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या कोचमध्ये पाणी नसल्याने नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन पाचवेळा चेनपुलिंग केली.

ठळक मुद्देपाचवेळा केली चेनपुलिंग : नऊ गाड्यांना झाला उशीर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या कोचमध्ये पाणी नसल्याची तक्रार करूनही रेल्वेने कोचमध्ये पाणी भरले नाही. पुढील रेल्वे स्थानकावर पाणी भरू असे सांगून प्रवाशांना गप्प बसविण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन पाचवेळा चेनपुलिंग केली. अखेर कोचमध्ये पाणी भरल्यानंतर ही गाडी तब्बल एक तासाने पुढील प्रवासासाठी रवाना झाली. परंतु यामुळे नऊ रेल्वेगाड्यांना विलंब झाला.रेल्वेगाडी क्रमांक १२९०५ पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या बी २ कोचमध्ये पाणी नव्हते. प्रवाशांनी अकोला रेल्वे स्थानकावर पाणी भरण्याची मागणी केली. परंतु पुढील रेल्वे स्थानकावर पाणी भरू असे त्यांना सांगण्यात आले. बडनेरा रेल्वे स्थानकावरही पाणी भरण्यात आले नाही. त्यामुळे प्रवासी चांगलेच संतापले. नागपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी सकाळी ९.५० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर आली. यावेळी कोचमध्ये पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका प्रवाशांनी घेतली. कोचमधील पाण्याचा व्हॉल्व्ह नादुरुस्त होता. तो दुरुस्त करून कोचमध्ये पाणी भरण्यासाठी तगादा लावला. परंतु पाणी न भरताच गाडी निघाल्यामुळे प्रवाशांनी चेनपुलिंग केली. पाणी भरण्यात येत नसल्याचे पाहून प्रवाशांनी तब्बल पाचवेळा चेनपुलिंग करून गाडी रोखून धरली. अखेर रेल्वे प्रशासनाने या कोचचा व्हॉल्व्ह दुरुस्त करून कोचमध्ये पाणी भरले. त्यानंतर तब्बल एक तासाने १०.५३ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. यामुळे तेलंगणा एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, आझादहिंद एक्स्प्रेस, संघमित्रा एक्स्प्रेससह नऊ रेल्वेगाड्यांना विलंब झाला.

टॅग्स :railwayरेल्वेwater shortageपाणीकपात