पूजा हिरवाडेला नाट्य मयुरी पुरस्कार
By Admin | Updated: January 24, 2016 03:10 IST2016-01-24T03:10:21+5:302016-01-24T03:10:21+5:30
नुकत्याच तिरुपती येथे झालेल्या श्री वारी कल्पश्री नाट्यांजली महोत्सवात नागपूरची मुलगी पूजा अनिल हिरवाडे हिचा ‘श्री वारी कल्पश्री नाट्य मयुरी’ नाट्य पुरस्काराने सत्कार करण्यात आला.

पूजा हिरवाडेला नाट्य मयुरी पुरस्कार
नागपूर : नुकत्याच तिरुपती येथे झालेल्या श्री वारी कल्पश्री नाट्यांजली महोत्सवात नागपूरची मुलगी पूजा अनिल हिरवाडे हिचा ‘श्री वारी कल्पश्री नाट्य मयुरी’ नाट्य पुरस्काराने सत्कार करण्यात आला. प्रतिभा नृत्य मंदिरच्या नृत्य रत्न गुरू रत्नम जनार्धनन यांच्या तालमीत शिकलेल्या पूजाने तिरुपती येथे कल्पश्री परफार्मिंग आर्ट्स सेंटर ट्रस्टच्या नाट्यांजली महोत्सवात भरतनाट्यम नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भरतनाट्यमप्रति पूजाचे समर्पण आणि ज्ञान याचा गौरव म्हणून तिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.