शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’द्वारे प्रदूषण नियंत्रण : प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला मनपाला ‘प्लॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 23:30 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देकठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणी हवी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रदूषणाचा विचार केला तर नागपूर शहर हे प्रदूषण यादीत असले तरी इतर मेट्रो शहरांच्या तुलनेत नियंत्रित राहिले आहे. लॉकडाऊनच्या काळात तर या स्थितीत अत्यंत समाधानकारक सुधारणा झाली आहे. मात्र लॉकडाऊन संपविल्यानंतर काय, हा चिंतनाचा विषय आहे. प्रदूषणाची स्थिती कायम नियंत्रणात ठेवायची असेल तर लॉकडाऊनसारख्या नियमांचे पालन नेहमी करावे लागेल. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. कठोर धोरण आणि सर्वसमावेशक अंमलबजावणीतूनच प्रदूषण नियंत्रणात राहील, असा विश्वास मंडळाच्या विभाग संचालिका डॉ. हेमा देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.नागपूरचा विचार केल्यास कार्बन, कार्बन मोनाक्साईड, सल्फरडायआॅक्साईड, नायट्रोक्साईड आदी प्रदूषण मानकांचे प्रमाण कायम धोक्याच्या पातळीच्या खाली राहिले आहे. मात्र खरी चिंता पर्टिक्युलेट मॅटर(धूलिकण)ची आहे. धोक्याची पातळी ८० मायक्रोग्रॅम असताना टाळेबंदीपूर्वी ती १२० मायक्रोग्रॅमच्यावर पोहचली होती. मोठ्या प्रमाणात चालणारे बांधकाम, मानवी हालचाल, वाहनांची वाढ आणि वीज प्रकल्प ही यामागची कारणे तज्ज्ञांद्वारे व्यक्त केली जातात. टाळेबंदीच्या काळात धुलिकणांचे प्रमाण ४० ते ५० मायक्रोग्रॅमपर्यंत खाली घसरले. वायू गुणवता ४८ ते ५९ वर स्थिर राहिली आहे, ही अत्यंत समाधानाची बाब म्हणावी लागेल. डॉ. देशपांडे यांच्या मते, टाळेबंदीच्या दोन-तीन दिवसातच परिस्थिती बदलली होती. टाळेबंदीनंतर मानवी हालचाली वाढल्यास कदाचित एवढ्याच दिवसात प्रदूषण पूर्वस्थितीत येईल. हेच आपणाला टाळायचे आहे.यासाठीच मंडळातर्फे ‘एअर अ‍ॅक्शन प्लॅन’ महापालिकेला सादर केला आहे. नियम आधीच बनलेले आहेत, गरज आहे ती केवळ कठोर अंमलबजावणीची. कचरा फेकणे, जाळणे याबाबत कठोर पावले उचलावी लागतील. नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा ठरेल. गरज नसेल तिथे गाड्यांचा वापर टाळावा. उद्योग आणि बांधकामे सुरू होतीलच, मात्र नियमांच्या बाबतीत मनपाने नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यात पोलीस, आरटीओ, अभियांत्रिकी कॉलेज, नीरी, एनएमआरडीए, जिल्हा पुरवठा अधिकारी, स्मार्ट सिटी अशा सर्वसमावेशक कृतीनेच आपण प्रदूषणावर नियंत्रण आणि आपले नागपूर पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित ठेवू शकतो, असा विश्वास डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केला.‘नीरी’चीही तयारीनीरीच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे मुख्य वैज्ञानिक डॉ. के. व्ही. जॉर्ज यांनी आपली भूमिका मांडली. लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असताना केवळ ऊर्जा प्रकल्प सुरू होते आणि तरीही प्रदूषण खाली आले आहे. यावरून ऊर्जा प्रकल्प प्रदूषणास अधिक कारणीभूत नाहीत. त्यामुळे आपल्याला बांधकामे आणि वाहने या प्रदूषणावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आम्ही अभ्यास करीत आहोत आणि त्यानुसार योजना तयार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊन काळात प्रदूषणात मोठी घट झाली, पण याच स्थितीत आपण राहू शकत नाही. लॉकडाऊन हटवावे लागेल आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटी पूर्वीप्रमाणे सुरू होतील. अशावेळी प्रदूषण नियंत्रित करणे नागरिकांची व सर्वांची जबाबदारी असेल. लॉकडाऊनसारख्याच नियमांचे पालन सर्वांना करावे लागेल. आता नागरिकांनीही त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.- डॉ हेमा देशपांडे, संचालिका, एमपीसीबी, नागपूर 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाenvironmentपर्यावरण