शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण पसरविणारे उद्योग एमपीसीबीच्या रडारवर, सात उद्योगांची बँक गॅरंटी जप्त

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 20, 2023 16:31 IST

सुधारणा न झाल्यास उद्योगांना टाळे ठोकणार

नागपूर : वायू व जल प्रदूषण पसरविणारे उद्योग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) रडारवर असून नोटीस दिल्यानंतरही सुधारणा न झालेल्या हिंगणा व बुटीबोरी येथील सात उद्योगांची एकूण ३६.५ लाखांची बँक गॅरंटी मंडळाने जप्त केली आहे. त्यानंतरही उद्योगाच्या संचालनात सुधारणा न झाल्यास अधिकारी उद्योगांना थेट टाळे ठोकणार आहेत.

प्रदूषण मंडळाची कठोर भूमिका

शिल्पा स्टील अ‍ॅण्ड पॉवर (१० लाख बँक गॅरंटी जप्त), जयस्वाल निको लि. रूईखैरी, वर्धा रोड (२ लाख), सुपरिअर ड्रिक्स प्रा.लि. (५ लाख), इंडिगो डेनिम प्रा.लि. (१० लाख), इंडोरामा सिंथेटिक्स (२ लाख), ग्राइंडवेल नॉर्टन (५ लाख), बुटीबोरी एमआयडीसी, केईसी इंटरनॅशनल (२.५ लाख), बुटीबोरी एमआयडीसी अशी उद्योगांची नावे असून त्यांच्याकडून एकूण ३६.५ लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त केली आहे.

ही कारवाई वर्ष २०२१ ते डिसेंबर-२२ या कालावधीसाठी करण्यात आली आहे. प्रदूषण पसरविणाऱ्यांविरुद्ध मंडळाने कठोर भूमिका घेतली आहे. प्रारंभी उद्योगाची तपासणी करून सुधारणा करण्याची नोटीस दिली जाते. त्यानंतरही अखेरची सूचना आणि नंतर बँक गॅरंटी जप्तीची कारवाई केली जाते. या प्रक्रियेनुसार या सात उद्योगांवर कारवाई करण्यात आली आहे. उद्योगातील रसायनयुक्त पाणी थेट नाल्यात सोडून जल प्रदूषण करणाऱ्यांना आधीच नोटीस दिल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

२१ उद्योगांना नोटीसा

मंडळाने हिंगणा आणि बुटीबोरी येथील २१ उद्योगांवर विविध कारणांनी ऑक्टोबर-२१ ते एप्रिल-२३ पर्यंत कारवाई केली आहे. यापैकी काहींना अंतरिम तर काहींना कंपनी बंद करण्याचे नोटीस दिले आहेत. या उद्योगांमध्ये नारायण प्रोसिड फूड, हरिवंश पॅकेजिंग, इंडिगो डेनिम, नोव्हेटिव्ह टेक्सटाईल, लार्सन टार्बो, स्वराज इंडस्ट्रीज, ग्राइंडवेल नॉर्टन, शिवम नायट्रेट, युनिटेक पॉवर ट्रान्समिशन, ग्रिप टाइट श्रिंक फिल्मस, प्लास्टिक इंडस्ट्रीज, मालू इलेक्ट्रो, असित ग्लास, खेमका उद्योग, बालाजी एन्टरप्राईजेस, सीबी प्लास्ट, प्रिज्म जॉनसन आदींचा समावेश आहे. तसेच प्लास्टिक अधिनियम २०१८ चे पालन न केल्यासंदर्भात अष्टविनायक प्लास्टिक इंडस्ट्रीला बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

उद्योगांनी करावे प्रदूषण मानकांचे पालन

उद्योगांना प्रदूषण मानकांचे पालन करणे आवश्यक आहे. न करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. वायू किंवा जल प्रदूषण पसविणाऱ्यांना आधी नोटीस देण्यात येते. नंतर पुन्हा नोटीस आणि सुधारणा न झाल्यास बँक गॅरंटी जप्त केली जाते. 

- आनंद काटोले, उपक्षेत्रीय अधिकारी, एमपीसीबी, नागपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषणnagpurनागपूर