३२० केंद्रांवर होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST2020-11-26T04:21:34+5:302020-11-26T04:21:34+5:30

नागपूर : भारत निवडणूक आयोगाने २३ तारखेच्या आदेशानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर ...

Polling will be held at 320 centers | ३२० केंद्रांवर होणार मतदान

३२० केंद्रांवर होणार मतदान

नागपूर : भारत निवडणूक आयोगाने २३ तारखेच्या आदेशानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली आहे.आता ३२० केंद्रावर मतदान होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने यासंदर्भात मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या नागपूर विभाग नागपूर पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची अंतिम यादी जाहीर करताना मतदारांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे.

कोविड -१९ संदर्भातील सूचनांचे पालन करून हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहे.

जिल्हानिहाय मतदान केंद्र

नागपूर १६२

भंडारा ३१

गोंदिया २१

वर्धा ३५

चंद्रपूर ५०

गडचिरोली २१

----------

एकूण ३२०

Web Title: Polling will be held at 320 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.