नगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी आज मतदान
By Admin | Updated: January 8, 2017 08:10 IST2017-01-08T08:10:29+5:302017-01-08T08:10:29+5:30
नगरपरिषदांच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुका आज होणार आहेत. यामध्ये नागपूरच्या 9 तर गोंदियातील 2 नगरपरिषदांचा समावेश

नगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी आज मतदान
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 8 - नगरपरिषदांच्या चौथ्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुका आज होणार आहेत. यामध्ये नागपूरच्या 9 तर गोंदियातील 2 नगरपरिषदांचा समावेश आहे.
यापूर्वी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे तीन टप्पे झाले आहेत. यामध्ये भाजपाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपची कामगिरी कशी होते याकडे लक्ष लागलं आहे.
आज होणा-या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचं होमग्राऊंड असलेल्या कळमेश्वर आणि मोहपाचाही समावेश आहे. सध्या कळमेश्वर आणि मोहपामध्ये भाजपचीच सत्ता आहे आणि ही सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे.