शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

काँग्रेसचे मनोरे कोसळले, मनपा निवडणुकीआधीच मनोबल खचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 11:35 IST

संघापासून भाजपपर्यंत सर्वांनीच नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर फोकस केला आहे. गडकरी-फडणवीस यांची जोडी ताकदीने मैदानात उतरली आहे.

ठळक मुद्देभाजपने होळीपूर्वीच उधळला गुलाल चौकार मारण्याचा मार्ग सुकर

कमलेश वानखेडे

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पाचपैकी चार राज्यात भाजपने सत्ता काबीज केल्याने नागपुरातही भाजपचा उत्साह वाढला आहे. गेल्या १५ वर्षांत महापालिकेतील भाजपची सत्ता उलथून फेकण्यासाठी कंबर कसणाऱ्या काँग्रेसजनांचे मनोबल पुरते खचले आहे. कितीही जोर लावला तरी भाजपला नमविणे सोपे नाही, संघभूमीत तर आणखीनच कठीण आहे, असे निराशेचे सूर काँग्रेसजन आळवू लागले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरचे महत्त्व भाजपसाठी किती आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. संघापासून भाजपपर्यंत सर्वांनीच नागपूर महापालिकेच्या निवडणुकीवर फोकस केला आहे. गडकरी-फडणवीस यांची जोडी ताकदीने मैदानात उतरली आहे.

येथे सत्तेचा चौकार मारण्यासाठी भाजप शक्ती पणाला लावणार आहे. काँग्रेससाठी नागपुरात तशीही लढाई सोपी नाही. टक्कर देण्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली. आपसात लढण्याऐवजी एक होऊन लढू, अशी समजदारीची भाषा ठेच लागलेले काँग्रेस नेते करू लागले आहेत. मात्र, उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तरांचल व मणिपूर या पाच राज्याच्या निकालांनी काँग्रेस नेत्यांसह लढण्यास इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. इच्छुक कार्यकर्ते दिवसभर एकमेकांना फोन करून चिंता व्यक्त करीत होते. काही कार्यकर्ते तर काँग्रेस नेत्यांनाच दोष देत होते.

या निकालांनी भाजपने होळीपूर्वीच गुलाल उधळला. असाच गुलाल महापालिकेच्या निवडणुकीतही उधळू, असा दावा करीत भाजप नेते काँग्रेस नेत्यांना दिवसभर डिवचताना दिसले.

भाजपमधील आऊटगोईंग थांबणार

दक्षिण नागपुरातील छोटू भोयर व सतीश होले या दोन नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी ही जमेची बाजू होती. भाजपमधील आणखी काही नगरसेवक व वजनदार कार्यकर्ते अशीच वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत होते. काँग्रेस नेत्यांशी प्राथमिक चर्चाही आटोपल्या होत्या. मात्र, पाच राज्याच्या निकालाने अजूनही भाजपचीच हवा असल्याचा मेसेज गेला. त्यामुळे आता भाजपमधील आऊटगोईंग थांबण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेत्यांचा कस लागणार

या निकालांनी भाजपचा पगडा कायम असल्याचे पुन्हा एकदा नागरिकांच्या मनावर कोरल्या गेले. त्यामुळे नागरिकांच्या मनातून भाजपची पाटी कोरी करण्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. संघटन बळकट करून थेट गल्ली, वस्त्यात शिरून ताकदीने बाजू मांडावी लागेल. काँग्रेस नेत्यांनी हे ‘मॅनेजमेंट’ वेळीच केले नाही तर कार्यकर्ते निराशेच्या गर्तेत जाण्याचा धोका आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcongressकाँग्रेसBJPभाजपा