शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांना मिळणार शेतकऱ्यांचे आव्हान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली.लोकजागर अभियानच्यावतीने शनिवारी राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट ...

ठळक मुद्देनवीन राजकीय पर्याय देणार : शेतकरी नेते व बुद्धिजीवींचे मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजपा-काँग्रेसला दूर ठेवत येणाऱ्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी विधानसभेत निवडून जावेत, यासाठी नवीन राजकीय पर्याय देण्याबाबत शनिवारी नागपुरात शेतकरी नेते व बुद्धिजींवीची महत्त्वाची बैठक पार पडली. याबैठकीत नवीन राजकीय पर्याय देण्यावर बहुतांश नेत्यांनी सहमती दर्शविली.लोकजागर अभियानच्यावतीने शनिवारी राष्ट्रभाषा सभा, वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, शंकरनगर चौक येथे राज्यातील काही निवडक शेतकरी नेते, पत्रकार व बुद्धिजीवींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकरी नेते विजय जावंधिया, चंद्रकांत वानखडे, अमर हबीब, प्रा. शरद पाटील, प्रा. ज्ञानेश वाकुडकर, श्रीकांत तराळ, राम नेवले, अमिताभ पावडे, विजय देशमुख, महादेव मिरगे, प्रा. संजय वानखेडे, गजानन अमदाबादकर, नारायण जांभुळे, डॉ. वसंत शिरभाते, राम घोडे, देवीदास लांजेवार यांच्यासह वेगवेगळ्या परिसरांमध्ये शेतकरी संघटनेचे काम करणारे तरुणकार्यकर्ते उपस्थित होते.‘मी एक मतदार आहे. पण काँग्रेस, भाजपला मी मतदान करू शकत नाही. त्यामुळे मतदानासाठी पर्याय असावा. मी केलेले मतदान हे शेतकऱ्यांचे बळ वाढवणारे असावे. यासाठी राज्यभर पुणे, मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद या ठिकाणी बैठक घेण्यात येणार असून त्या त्या भागातल्या शेतकरी नेत्यांना यात सहभागी केले जाईल, असा विश्वास ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब व्यक्त केला आहे.'शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा'भाजप आणि काँग्रेसही शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, नवीन राजकीय पर्याय देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ‘शंभर युवा आणि महाराष्ट्र नवा’ या नाऱ्यासह शेतकऱ्यांची मुले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे लोकजगार अभियानाचे अध्यक्ष व या शेतकरी बैठकीचे आयोजक ज्येष्ठ कवी प्रा. ज्ञानेश वाकूडकर यांनी सांगितले. लवकरच शेतकरी नेते आणि तरुण शेतकरी कार्यकर्ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. यादरम्यान विभागीय स्तरावर बैठका घेण्यात येणार असून नवीन राजकीय पक्षाची घोषणाही लवकरच करण्यात येईल. राजकीय पर्याय म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची मुले निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवल्या जातील. यात १०० युवा महाराष्ट्र नवा' या घोषणेप्रमाणे १०० जागांवर तरुण निवडणूक लढवतील. लोकसभा निवडणुकीतही काही जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर