शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनी विद्यार्थिनींवर नोटा उधळणारा हवालदार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 10:39 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर नोटा उधळणारा नांद पोलीस चौकीचा बीट अंमलदार प्रमोद वाळके याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांची कारवाई दोन पोलिसांच्या बदल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या शाळकरी मुलींवर नोटा उधळणारा नांद पोलीस चौकीचा बीट अंमलदार प्रमोद वाळके याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच वाळके याच्यासोबत दारू पिणाऱ्या उमरेड पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार अजय चौधरी व सुनील बनसोड यांची नागपूर ग्रामीण पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘पोलिसाने उधळल्या विद्यार्थिनींवर नोटा’ या मथळ्यातील वृत्त प्रकाशित करीत नांद येथे जि.प. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गोंधळ घालणारा पोलीस हवालदार प्रमोद वाळके याच्या कृत्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी उपरोक्त कारवाई केली आहे. यासोबतच या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले. नांद जिल्हा परिषद हायस्कूल व माध्यमिक विद्यालयात शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान सहाव्या वर्गातील मुलींच्या नृत्याचे सादरीकरण सुरू असताना प्रमोद वाळके हा मंचावर पोहचला व त्याने मुलींच्या अगदी मधोमध जाऊन नृत्याच्या सादरीकरणादरम्यान नोटांची उधळण केली होती. या गैरवर्तनप्रकरणी वाळके याच्यावर कारवाई करण्याची मागणी नांद येथील सरपंच तुळशीदास चुटे व ग्रामस्थांनी केली होती. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsuspensionनिलंबन